Tuesday, January 14, 2025
HomeNewsकविता : प्रेम विरह ? - प्रताप शेजवळ

कविता : प्रेम विरह ? – प्रताप शेजवळ

तुझ्यापासून असं दूर होताना 

डोळ्यात पाणी आलं..

तू झाली दुसऱ्याची ऐकुन 

माझ्या काळजाचं पण पाणी झालं…

मला माहित आहे 

तू तुझ्या मनाची राणी आहेस

पण तुला माहित नाही की 

तु माझ्या डोळ्यातील पाणी आहेस..

माझ्या काळजाचे ठोके आहेस.. 

माझा श्वास आहेस..

विसरावे म्हणतो तुला रोज

मी खुप प्रयत्न करतो,

पण नेमक त्याच क्षणी तुलाच आठवतो.. 

फक्त तुलाच आठवतो..

✍? प्रताप शेजवळ


संबंधित लेख

लोकप्रिय