Friday, April 26, 2024
HomeNewsज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना दादासाहेब फाळके पुरस्कार !

ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना दादासाहेब फाळके पुरस्कार !

ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख Asha Parekh यांना 2020 चा दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. याबाबत केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी मंगळवारी माहिती दिली.

दादासाहेब फाळके पुरस्कार हा भारतीय चित्रपट क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान मानला जातो. आशा पारेख यांचा भारतीय सिनेमा आजच्या टप्प्यावर आणण्यात मोलाचा वाटा आहे. 79 वर्षीय आशा पारेख यांनी ‘दिल देके देखो’, ‘कटी पतंग’, ‘तीसरी मंझिल’ आणि ‘कारवां’ सारख्या हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. ती हिंदी चित्रपटसृष्टीतील आयकॉनिक अभिनेत्री मानली जाते. यापूर्वी 2019 चा दादासाहेब फाळके पुरस्कार साऊथ सुपरस्टार रजनीकांत यांना देण्यात आला होता. पारेख यांनी 1990 च्या दशकाच्या उत्तरार्धात प्रसिद्ध टीव्ही मालिका ‘कोरा कागज’ दिग्दर्शित केली. निर्माता आणि दिग्दर्शक म्हणूनही त्यांचं काम अभूतपूर्व आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय