Wednesday, January 15, 2025
Homeपुणे - पिंपरी चिंचवडमायक्रो फायनान्स कंपनीच्या दादागिरीला आळा घाला - DYFI ची मागणी

मायक्रो फायनान्स कंपनीच्या दादागिरीला आळा घाला – DYFI ची मागणी

पिंपरी चिंचवड : मायक्रो फायनान्स कंपनी कडून कर्ज वसूली करताना दादागिरी करून मानसिक त्रास देण्यात येतो, त्याला अटकाव करा अशी मागणी डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडिया (DYFI) पुणे जिल्हा कमिटीच्या वतीने पिंपरी चिंचवड महानगरपालिका शहर पोलिस आयुक्त यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहर हे उद्योग नगरी म्हणून निर्माण झालेलं शहर आहे या शहरांमध्ये बहुसंख्य नागरिक हे कामगार कष्टकरी वर्गात मोडणारे नागरिक आहेत. आपण जाणताच मागील दोन वर्षापासून देशभरामध्ये लॉकडाऊन असल्यामुळे उपरोक्त वर्गाच्या जगण्याचा संघर्ष वाढला आहे. त्यात प्रामुख्याने नोकरी जाणे पगार कमी होणे महागाई वाढणे या सर्वांच्या परिणामी वरील वर्गाला नोंदणीकृत मायक्रो फायनान्स कंपन्या तसेच फायनान्स कंपन्यांकडून कर्ज घ्यावे लागते. हे कर्ज घेणे कष्टकरी जनतेला नितांत गरजेचे असते कारण त्यांच्याकडे असलेली नोकरी त्यातून मिळणारा तुटपुंजा पगार यामध्ये आपला महिन्याभराचा घर खर्च हे नागरिक भागवू शकत नाहीत. 

पिंपरी चिंचवड : 200 रुपयानी पगारवाढ करा, पुणे जिल्हा घरकामगार संघटनेची मागणी

परिणामी त्यांना मुलांच्या शिक्षणासाठी, आरोग्यासाठी व इतर मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी कर्ज घ्यावे लागते. हे कर्ज देत असताना या मायक्रो फायनान्स फायनान्स कंपन्या संकटात सापडलेल्या नागरिकांचा गैरफायदा घेऊन कमी कागदपत्रांमध्ये त्यांना कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. परंतु कर्ज दिल्यानंतर अव्वाच्या सव्वा व्याज दर आकारणे व भरमसाठ हप्ते वसूल करणे तसेच भरलेले हप्ते व मूळ रक्कम  शिल्लक रक्कम यांची स्टेटमेंट दिली जात नाही. ज्यामुळे कर्जदाराला नेमके किती पैसे भरले शिल्लक किती आहेत याबद्दल काहीही थांगपत्ता लागत नाही वर्षानुवर्ष अशा व्यक्तींचे शोषण ह्या फायनान्स कंपन्या करत असतात, असेही म्हटले आहे.

कर्जदाराकडून एखादा हप्ता जरी थकला तरी अर्वाच्च भाषेमध्ये शिवीगाळ करणे, धमकी देणे, घरी माणूस पाठवून धिंगाणा घालण्याची धमकी देणे, असे प्रकार सर्रास केले जातात. ज्यामुळे कष्टकरी गरीब वर्गाला प्रचंड मानसिक त्रास होतो हा जो कष्टकरी गरीब वर्ग आहे तो नेहमीच आपली इभ्रत जाऊ नये म्हणून प्रयत्नरत असतो. अशावेळी हप्ते भरून सुद्धा जर मानसिक त्रास दिला गेला तर अशी व्यक्ती टोकाचं पाऊल उचलून आत्महत्या करू शकते त्यामुळे अशा प्रकरणांमध्ये आपण हस्तक्षेप करून तात्काळ या वर्गाला न्याय देण्याचे काम करावे, अशी मागणी केली आहे.

आपल्या पुण्यात नोकरी शोधताय ? मग आजच अर्ज करा या 8 सरकारी, निमसरकारी नोकरीसाठी !

तसेच सर्व फायनान्स कंपन्या, मायक्रो फायनान्स कंपन्या, तसेच अनोंदणीकृत रित्या या व्यवसायामध्ये असणाऱ्या फायनान्स कंपन्यांच्या प्रतिनिधींची तात्काळ बैठक बोलावून योग्य तो तोडगा काढावा व या बैठकीमध्ये डी वाय एफ आय च्या प्रतिनिधींनाही बोलवावं, अशी मागणी करण्यात आली आहे.

निवेदनावर सचिन एम आर, आशिष मेरूकर, अमिन शेख, संतोष गायकवाड, शिवराज अवळोल, ज्ञानेश्वर मोटे यांची नावे आहेत.

जळगाव जिल्हा परिषद अंतर्गत विविध पदांसाठी भरती, आजच करा अर्ज !

राष्ट्रीय आरोग्य अभियान, धुळे अंतर्गत विविध पदांसाठी भरती

नवीन भरती : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत रिक्त पदांसाठी भरती, असा करू शकता अर्ज


संबंधित लेख

लोकप्रिय