पिंपरी चिंचवड : आज देशात कामगार शेतकरी शेतमजूर मधेमवर्गीय माणूस महागाईने त्रस्त असून 450 रुपयेला मिळणारा गॅस 1100 रुपये ला झाला आहे. पेट्रोल डिझेलनी शंभरी पार केली आहे. जीवनावश्यक वस्तूवर जीएसटी लावून सरकाने गोरगरिबांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम पद्धतशीर पद्धतीने केले आहे. गॅस सबसिडी सोडून देण्याचे आव्हान करून कोरोनानंतर सर्वांची गॅस सबसिडी बंद केली आहे. त्याच पद्धतीने आज रेशन दुकानासमोर ही रेशन सोडून द्या, चे बोर्ड लावून गोरगरीब कामगार शेतकरी मध्येम वर्गावर दबाव आणून फॉर्म भरून घेतले जात आहेत. म्हणजेच सरकारने रेशन व्यवस्थाही बंद करण्याचा घाट घातला आहे, असा आरोप अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या शहर अध्यक्षा अपर्णा दराडे यांनी केला आहे.
या विरोधात आज पिंपरी चिंचवड शहरात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व अखिल भारतीय जनवादी महिला संघटना यांच्या वतीने तहसीलदार गीता गायकवाड व रेशन वितरण अधिकारी दिनेश तावरे यांना निवेदन देऊन रेशन दुकानासमोर लावलेले बोर्ड काढून टाकवेत व जबरदस्तीने फॉर्म भरून घेणे थांबवावे अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या पिंपरी चिंचवड शहर अध्यक्षा, अपर्णा दराडे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षचे डॉ. बाबासाहेब देशमुख, DYFI चे पिंपरी चिंचवड शहर सचिव अमीन शेख, शिवराज अवलोल, मंगल सूर्यवंशी, गुलनाज शेख आदींसह उपस्थित होते.