औरंगाबाद:-जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढतच असून आज पुन्हा एकदा द्विशतकी म्हणजेच २७७ कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. ज्यामध्ये मनपा हद्दीतील २२४ तर ग्रामीण भागातील ५३ रुग्णांचा समावेश आहे. तर नव्याने सापडलेल्या २७७ रुग्णांमुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ७९४९ इतकी झाली आहे. आज जिल्ह्यातील ३०१ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केल्यामुळे त्यांना सुटी देण्यात आली. आजपर्यंत ४४६३ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.तर कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागलेल्या रुग्णांची संख्या ही वाढली असून एकूण ३४२ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या एकूण ३१४४ रूग्णांवर उपचार सुरू आहेत.आजपासून शहरात लागू झालेल्या संचारबंदी ला शहरात चांगला प्रतिसाद मिळाला असून शहरात सर्वत्र रस्ते निर्मनुष्य दिसत होते. पुढच्या काळातही जनतेने कोरोना रुग्ण साखळी तोडण्यासाठी प्रशासनाला असेच सहकार्य करावे,असं प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
दोन कोरोनाबधितांचा मृत्यू
घाटी मध्ये बीड बायपास रोड, सातारा येथील ६५ वर्षीय व एका खासगी रुग्णालयात एन-११,मयूर नगर, हडकोतील ७८ वर्षीय पुरुष या रुग्णांचा मृत्यू झाला आहे.