Thursday, December 5, 2024
Homeविशेष लेखकोरोना भेदभाव करत नाही , पण कोरोना भेदभाव व विषमता उघड करतो...

कोरोना भेदभाव करत नाही , पण कोरोना भेदभाव व विषमता उघड करतो हे मात्र खरंय …! – डॉ.संजय दाभाडे

            सारे भारतीय एक आहोत हे मान्य. पण करोनाचे बळी ठरलेल्या सामाजिक गटांचा लेखाजोखा समोर यायला हवाय. मोठ्या प्रमाणात विशिष्ट समाज घटक का बळी पडत आहेत, लोकडाऊन ने कुणाची दैना केली, हे  समोर यायला हवं.

कोरोना देशात उच्चभ्रू वर्गाने विमानातून भारतात आणला, त्यांना आणण्यासाठी सरकारने खास विमानसेवा बहाल केली. पण इथं देशात करोना उच्चभ्रू वस्त्यांत नव्हे तर झोपडपट्यांत घुसला नि माणसं मारत सुटला. 

पुण्यात औंध, बाणेर, एरंडवाना नि कोथरूड सुरक्षित नि दलित कष्टकऱ्यांचे येरवडा, कासेवाडी कंटेनमेंट झोन म्हणून बंदिस्त. लॉकडाऊन ची झळ ह्याच कष्टकरी वर्गाला प्रामुख्याने बसली तर उच्चभ्रू मंडळी लाकडाऊनची मज्जा लुटत राहिला, रेसिपीज व कौटुंबिक सुख लुटू लागला. हि वस्तुस्थिती नेमकी काय आहे, हे समोर यायला हवं.

   

करोनाच्या परिणामांचा एथनिक Ethnic ( वांशिक ) अभ्यास अन्य ठिकाणी केला जात आहे. ‘ब्रिटिश मेडिकल जर्नल ‘ ह्या अत्यंत प्रतिष्टीत अत्यंत मेडिकल जर्नल मध्ये म्हटलंय कि ब्रिटन मध्ये एथनिक मायनॉरिटीजचं करोना मुळे मृत्यूचं प्रमाण बहुसंख्यांक गोऱ्यांपेक्षा  दुप्पट ते चौपट आहे. ( संदर्भ – ब्रिटिश मेडिकल जर्नल , २६ जून २०२० ). अमेरिकेतील न्यूयॉर्क टाइम्सने New York Times देखील हे करोना बाधितांचं वांशिक चित्र स्पष्टपणे मांडलं आहे. अमेरिकेतील लुईसना येथे करोना मुळे झालेल्या मृत्यूंपैकी ७० टक्के मृत्यू आफ्रो अमेरिकनांचे झालेत.

अश्या अभ्यासातून फक्त हेल्थकेयर डिलिव्हरी मधील विषमता नव्हे तर एकूणच सामाजिक, आर्थिक विषमता अधिक ठळकपणे दिसून येते. विशिष्ट सामाजिक गटाचं असुरक्षित ऑक्युपेशन, अत्यावश्यक सेवेतील सहभाग, असुरक्षित रोजगार, वस्त्यांचा व रहिवासाचा भीषण बकालपणा ह्या बाबी अधीरेखित होऊन उपाययोजनांकडे लक्ष वेधणं शक्य होऊ शकत.

आपल्या सामाजिक उघड्या – नागड्या वास्तवाला कार्पेट खाली झाकून ठेवण्यात काही अर्थ नाही. कोरोना भेदभाव करत नाही परंतु समाजव्यवस्थेतील विषमता व भेदभाव मात्र ठळकपणे उघड करतो…! समाज व शासनसंस्थेने ह्या वास्तवाची दखल घेत त्यावर व्यापक पातळीवर उपाययोजना करणं हा करोना विरुद्धच्या लढाईचा दीर्घपल्ल्याचा भाग बनणं आवश्यक आहे.

संदर्भ -● ब्रिटिश मेडिकल जर्नल British Medical Journal  , २६ जून २०२० ….

https://www.bmj.com/content/369/bmj.m2503 Covid-19 and ethnic minorities: an urgent agenda for overdue action

BMJ 2020; 369 doi: https://doi.org/10.1136/bmj.m2503 (Published 23 June 2020.

● https://www.nytimes.com/2020/04/14/opinion/sunday/coronavirus-racism-african-americans.html

डॉ.संजय दाभाडे, पुणे 

९८२३५२९५०५

sanjayaadim@gmail.com

संबंधित लेख

लोकप्रिय