Sunday, May 19, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडमराठा आणि ओबीसी आरक्षण संपवण्याचे कारस्थान भाजपच्या सत्ताकाळात - काशिनाथ जगताप

मराठा आणि ओबीसी आरक्षण संपवण्याचे कारस्थान भाजपच्या सत्ताकाळात – काशिनाथ जगताप

पिंपरी चिंचवड : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना  राज्यात असतानाच ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात आणण्याची सुरुवात झाली आणि त्याला केंद्रातील भाजप सरकारने साथ दिली. मराठा आरक्षण ही भाजपच्या  आरक्षण विरोधी अजेंड्यामुळे संपुष्टात आले. हे उघड सत्य आहे.त्यामुळे भाजपला ओबीसींच्या आरक्षणावर बोलण्याचा काहीही अधिकार नाही. केंद्रामध्ये भाजपचे राज्यांमध्येही भाजपची सत्ता असताना भाजपची आरक्षणाबाबत भूमिका राजकीय गोंधळ निर्माण करणारी आहे. असा स्पष्ट आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहर सरचिटणीस काशिनाथ जगताप यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.

इंपिरिकल डेटा देण्याबाबत स्पष्ट भूमिका भाजप ने घेतली असती तर न्यायालयात वेळेत तो डेटा सादर करता आला असता. महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आले त्यानंतर कोरोनाच्या महामारी विरोधात राज्यसरकार व्यस्त होते. प्रशासकीय अडचणी होत्या. हे सर्व माहीत असूनही माजी मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस साहेब सर्वसामान्य जनतेची दिशाभूल करण्याचे काम ठाम पणे करत आहेत. मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली भूमिका आणि आताची भूमिका किती गोंधळ करणारी आहे. हे त्यांच्या त्यावेळच्या टीव्ही चैनलवरील विधानावरून स्पष्ट होत आहे.

– क्रांतिकुमार कडुलकर

आपल्या पुण्यात नोकरी शोधताय ? मग आजच अर्ज करा या 8 सरकारी, निमसरकारी नोकरीसाठी !

मायक्रो फायनान्स कंपनीच्या दादागिरीला आळा घाला – DYFI ची मागणी

भारतीय उष्णदेशीय मौसम विज्ञान संस्थान पुणे येथे विविध पदांसाठी भरती, असा करा अर्ज !

मायक्रो फायनान्स कंपनीच्या दादागिरीला आळा घाला – DYFI ची मागणी

नवीन भरती : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत रिक्त पदांसाठी भरती, असा करू शकता अर्ज


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय