Friday, April 18, 2025
---Advertisement---
---Advertisement---

सोनिया गांधी यांच्या ईडी चौकशी विरोधात काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक

नवी दिल्ली : ‘नॅशनल हेराल्ड’शी (National Herald) संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना आज चौकशीसाठी बोलावले आहे. या ईडी चौकशीच्या विरोधात काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले असून काँग्रेस पक्ष आज देशव्यापी आंदोलन करत आहे.

---Advertisement---

नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीने सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना चौकशीसाठी समन्स बजावलं होतं. त्यावेळी सोनिया गांधींना कोरोना झाल्यामुळे त्या ईडी चौकशीसाठी उपस्थित राहिल्या नव्हत्या. त्यांनी ईडीकडे पुढची तारीख मागितली होती. यापूर्वी ईडीने राहुल गांधींची पाच दिवस चौकशी केली आहे. त्यावेळी देखील कांग्रेस कार्यकर्त्यांनी सलग 5 दिवस ईडी कार्यालयाबाहेर आंदोलन केलं होतं. यावेळी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना पोलिसांनी ताब्यातही घेतलं होतं. आज पुन्हा ईडीने सोनिया गांधी यांच्या चौकशीसाठी बोलावले आहे. ईडीच्या या चौकशीच्या विरोधात महाराष्ट्रासह देशभरात काँग्रेसकडून आंदोलनं केली जात आहे. अनेक ठिकाणी पोलिसांनी देखील काँग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.

काय आहे नॅशनल हेराल्ड प्रकरण

---Advertisement---

नॅशनल हेराल्ड हे एक वृत्तपत्र आहे. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 1938 साली हे वृत्तपत्र सुरू केले होते. या कंपनीवर सुरुवातीपासून काँग्रेस आणि गांधी घराण्याचे वर्चस्व होते. 2008 मध्ये हे वृत्तपत्र तोट्यात गेल्याने बंद करावे लागले. भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांच्या आरोपांनुसार, काँग्रेसने असोसिएटेड जर्नल्स लिमिटेडला पार्टी फंडातून 90 कोटी रुपयांचे व्याज न देता कर्ज दिले. त्यानंतर हे कर्ज वसूल करून एजीएलची मालकी मिळवण्यासाठी बनावट कंपनी तयार करून हेराफेरी करण्यात आली. 26 फेब्रुवारी 2011 रोजी 50 लाख रुपये खर्चून यंग इंडिया कंपनीची स्थापना करण्यात आली. सोनिया आणि राहुल यांची यंग इंडिया कंपनीत 38-38 टक्के हिस्सेदारी आहे. उर्वरित 24 टक्के काँग्रेस नेते मोतीलाल व्होरा आणि ऑस्कर फर्नांडिस यांच्याकडे आहे.

हेही वाचा :

भारतीय पोस्टल विभाग, पुणे येथे रिक्त जागांसाठी भरती, 30 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

जिल्हा परिषद जळगाव अंतर्गत 145 रिक्त पदांसाठी भरती, 20000 ते 28000 रूपये पगाराची नोकरी

नवीन भरती : मेल मोटर सेवा पुणे येथे रिक्त पदांसाठी भरती, 30 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

कदंबा ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये 134 पदांसाठी भरती, 10 वी / ITI / पदवीधरांसाठी संधी

MPSC मार्फत 800 जागांसाठी भरती, 24 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि.मध्ये विविध पदांची भरती, 26 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles