Thursday, December 5, 2024
Homeराज्यमाजी आमदार नरसय्या आडम मास्तरांनी कामागरांच्या अनुदानाचे अर्ज हातगाडीवर नेत केले अनोखे...

माजी आमदार नरसय्या आडम मास्तरांनी कामागरांच्या अनुदानाचे अर्ज हातगाडीवर नेत केले अनोखे आंदोलन.

सोलापूर : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सरचिटणीस माजी आमदार नरसय्या आडम मास्तरांनी यांनी कामगारांचे अनुदानाचे अर्ज हातगाडीवर नेत आज आनोखे आंदोलन करत जनतेचे आणि प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले.

२१.५ लाख कोटीचे पॅकेज सरकारने जाहीर केले त्यात उद्योजकांच्या कर्जासाठी ११.५ लाख कोटी राखून ठेवले, भांडवलदारांचे ७.५ लाख कोटी कर्जमाफी केली तर कामगारांसाठी ३.५ लाख कोटी रुपयांची तरतूद केली. जनधनच्या नावाने फक्त ५०० रुपयांची मदत दिली. ही विसंगती आम्हाला मान्य नाही. इंधन दरवाढीतुन १८ लाख कोटी रुपयांची कमाई करून केंद्र सरकारने आपली तिजोरी भरलेली आहे. लोकांची क्रयशक्तीच नसेल तर बाजारपेठ आणि अर्थव्यवस्थेला गती कशी प्राप्त होईल? त्यासाठी केंद्र सरकारने आयकर लागू नसणाऱ्यांना दरमहा सात हजार पाचशे रुपये आर्थिक मदत, आणि माणसी १० किलो मोफत रास्त अन्नधान्य आणि राज्य सरकारने टाळेबंदीच्या कालावधीतील उदरनिर्वाहासाठी १० हजार रुपये रोख रक्कमेची मागणी केलेल्या अर्जदारांना द्यावे, जर ९ ऑगस्टच्या आत याचा निर्णय नाही झाल्यास १ लाख कामगारांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकेल, असा इशारा ज्येष्ठ कामगार नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम (मास्तर) यांनी दिला. 

ते बोलताना पुढे म्हणाले की, राज्य सरकार उद्योजकांना व कारखानदारांना २००२ पासून दर वर्षाला एक ते दिड हजार कोटी रुपयांची सवलत देऊन एका युनिटला १ रुपये पंचवीस पैसे आकारणी  करतात मात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी होत नाही, कामगार भुकेकंगाल होत आहे. ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. 

केंद्रीय कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने ३ जुलै हा दिवस मागणी दिन पाळण्याची हाक देण्यात आली असून त्या अनुषंगाने सोलापूरात सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्सच्या वतीने आज ३ जुलै रोजी ज्येष्ठ कामगार नेते माजी आमदार कॉ नरसय्या आडम (मास्तर) यांच्या मार्गदर्शनाखाली सिटूचे राज्य महासचिव अँड.एम.एच.शेख यांच्या नेतृत्वाखाली सोलापूरातील विडी, यंत्रमाग, घरेलू, रेडिमेड व शिलाई, ऑटो रिक्षा चालक तसेच १२२ उद्योग धंद्यातील असंघटीत कामागरांचे टाळेबंदीच्या कालावधीतील उदरनिर्वाहासाठी राज्य सरकार १० हजार रुपये रोख अनुदान देण्यात यावे या करिता प्रत्येकांचे वैयक्तीक अर्ज भरून सिटू कडे जमा करण्यात आले होते. यामध्ये रिक्षा चालक व मालक यांचे ११ हजार ३७१, यंत्रमाग कामगार १० हजार ४५३, विडी कामगार २० हजार ५५७, असंघटीत ५५ हजार ०८६, असे एकूण ९७ हजार ४७७ अर्ज व त्याची सविस्तर माहिती असणारे CD व अर्ज निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख यांच्याकडे शिष्टमंडळामार्फत सुपूर्द केले. यावेळी सिटूचे राज्य महासचिव अँड.एम.एच.शेख, नगरसेविका कामिनी आडम, माजी नगरसेविका नसीमा शेख,नलिनी कलबुर्गी, सुनंदा बल्ला, सिद्धप्पा कलशेट्टी, युसूफ मेजर, व्यंकटेश कोंगारी आदी उपस्थित होते. 

यावेळी लॉकडाऊन ते अनलॉक सुरू झाल्यापासून आजमितीला  केंद्र सरकार, राज्य सरकार आणि प्रशासनाशी सातत्याने कष्टकरी कामगार वर्गाचे प्रश्न घेऊन लढा देत आहेत. त्यांना अन्नधान्य, उदरनिर्वाहास रोख अनुदान आणि रोजगार मिळावे म्हणून आज वयाच्या पंचाहत्तरीत सुद्धा कॉ. नरसय्या आडम (मास्तर) कामगारांचे ओझे आपल्या पाठीवर घेऊन राज्य सरकार कडून अर्ज दाखल केलेल्या प्रत्येक कामगाराला १० हजार रोख अनुदान मिळावे या करिता त्यांचे वैयक्तीक अर्ज हमाल गाडीवरून जिल्हा परिषद पूनम गेट ते जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत हमाल गाडी ओढत आणले.  

यावेळी सिटूचे कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यात झटपट झाली त्यानंतर पोलीस आयुक्तालय आणि सदर बझार पोलीस ठाणे प्रशासनाकडून माजी आमदार कॉ आडम मास्तर यांच्यासह १६ कार्यकर्त्यांना अटक केले.

या आंदोलनात कुरमय्या म्हेत्रे, रंगप्पा मरेड्डी, सलीम मुल्ला, अनिल वासम दाऊद शेख, नरेश दुगाणे, अशोक बल्ला, शंकर म्हेत्रे, दीपक निकंबे, माशप्पा विटे, लिंगव्वा सोलापूरे, बापू साबळे, विल्यम ससाणे, वसीम मुल्ला, बाबू कोकणे, किशोर मेहता, शकुंतला पानिभाते, अकील शेख, आसिफ पठाण, इलियास सिद्दीकी, जावेद सगरी, श्रीनिवास गड्डम, आप्पाशा चांगले, राजेंद्रप्रसाद गेंट्याल, रवी गेंट्याल, बाळासाहेब मल्ल्याळ, सनी शेट्टी, विजय हरसुरे आदी सह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.

संबंधित लेख

लोकप्रिय