Friday, May 3, 2024
Homeजिल्हाकम्युनिस्ट विचारसरणी ही मानवी शोषण मुक्तीचा विचार - शंकरराव दानव यांचे प्रतिपादन

कम्युनिस्ट विचारसरणी ही मानवी शोषण मुक्तीचा विचार – शंकरराव दानव यांचे प्रतिपादन

गोडगाव विजासन येथे माकपचे वणी तालुका पक्ष शिक्षण शिबीर संपन्न

वणी
: “भांडवलदारी व्यवस्थेमध्ये शेतकरी व कामगारांवरील संकट वाढले असून एकीकडे शेतकरी आत्महत्या करीत आहेत तर दुसरीकडे कामगारांचे शोषण प्रचंड वाढले आहे. दोन्ही वर्ग सातत्याने आंदोलन करीत आहेत. शेतकरी व कामगारांच्या संघर्षात कम्युनिस्टांच्या लाल झेंडा अग्रस्थानी फडकत आहे. मालक- नोकर, श्रीमंत-गरीब हा वर्गभेद संपविण्यासाठी कम्युनिस्टांचा संघर्ष असल्याने कम्युनिस्ट विचार मानवमुक्तीचा विचार असून ह्या संघर्षात कष्टकऱ्यांकडे गमविण्यासाठी गुलामगिरीच्या बेड्या शिवाय काहीच नाही, त्यामुळे शेतकरी व कामगारांनी कम्युनिस्ट विचार आत्मसात करून संघटीत व्हावे.” असे आवाहन दि २० सप्टें.२२ रोजी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या गोडगाव विजासन येथे झालेल्या पक्ष शिक्षण शिबिरात प्रमुख मार्गदर्शक म्हणून कॉ. शंकरराव दानव यांनी केले.

दि. १४ ते २४ सप्टेंबर दरम्यान माकपचे कार्यकर्ता शिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अंतर्गत गोडगाव विजासन येथे झालेल्या शिक्षण शिबिराचे अध्यक्षस्थानी कॉ. गजानन ताकसांडे होते. तर जिल्हा सचिव कुमार मोहरमपुरी, जिल्हा कमिटी सदस्य ऍड. दिलीप परचाके हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून मनोज काळे, कवडू चांदेकर, वंदना गेडाम, नंदकिशोर बोबडे उपस्थित होते.

कॉ. दानव पुढे मार्गदर्शन करताना म्हणाले की, भांडवली व्यवस्था कष्टकऱ्यांच्या शोषणावर टिकून आहे तर कम्युनिस्ट विचार शोषणाला संपविणारे आहे. म्हणून भांडवलदार कम्युनिस्ट विचारांना संपवू इच्छितात, परंतु शोषणाची प्रक्रिया जेवढी वाढेल तेवढे कम्युनिस्ट वाढेल. मार्क्स यांनी सांगितले की भांडवलदारी व्यवस्थेच्या गर्भातच कम्युनिस्ट वाढतो व त्यांच्या जन्मनेच समाजवादी व्यवस्थेचा उदय होऊन शोषणाची व्यवस्था समूळ नष्ट होते. कष्टकऱ्यांची एकजूट आणि संघर्ष हाच भांडवलदारी व्यवस्थेचा नायनाट करेल. या शिबिराला कॉ. कुमार मोहरमपुरी व कॉ. ऍड. दिलीप परचाके यांनीही मार्गदर्शन केले.

या शिबिराला वणी तालुक्यातील अनेक गावातील स्त्री पुरुष व तरुण कार्यकते सहभागी झाले होते. शिबिराला यशस्वी करण्यासाठी कॉ. अमोल चटप, प्रदीप ताकसांडे, वैभव मजगवळी, बादल संजय कोडापे, प्रशांत कूळमेथे, अहिल्या ताकसांडे, उषा कोडापे, शोभा सरोदे, बेबी सरोदे, मंगेश सरोदे, शंकर गाऊत्रे आदीनी परिश्रम घेतले.

Lic
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय