Saturday, May 4, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडकेबल नेटवर्क प्रकरण : नामदेव ढाके अज्ञानी आहेत, त्यांनाही तोंड लपवायची वेळ...

केबल नेटवर्क प्रकरण : नामदेव ढाके अज्ञानी आहेत, त्यांनाही तोंड लपवायची वेळ येईल – नाना काटे

पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : हिंदुत्वाचा बुरखा पांघरून छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार कऱणाऱ्यांनी दुसरीकडे दुबई, पाकिस्तानातील गुन्हेगरांशी संबंधीत कपंनीकडे पिंपरी चिंचवड शहरातील इंटरनेट केबल नेटवर्क सोपविण्यासाठी आटापीटा केला. पुरावे मिळताच सत्ताधारी दुटप्पी, भ्रष्ट, भंपक भाजप नेत्यांचा हा बुरखा राष्ट्रवादी काँग्रेसने टराटरा फाडल्यानेच आता भाजप नेत्यांची अक्षरशः तंतरली आहे. या प्रकरणात महापालिका निवडणुकित हात पाय भाजणार आणि तोंडही पोळणार असे दिसताच भाजपचे माजी सत्ताधारी नेते नामदेव ढाके यांचे बाहुले पुढे करून `मी नाही त्यातली…` अशा थाटात आव आणत उलटपक्षी राष्ट्रवादी काँग्रेसवर आरोप करणाऱ्यांची अवस्था केविलवाणी आहे. ढाके यांचे या प्रकरणातील अज्ञान त्यात दिसले असून माजी सत्ताधारी नेते एकनाथ पवार यांच्या पाठोपाठ त्यांच्यावरही तोंड लपवायची पाळी येईल, अशी परखड टीका महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी प्रसिध्दीपत्रातून केली आहे.

स्मार्ट सिटी प्रशासनाच्या माध्यमातून शहरात इंटरनेट नेटवर्किंगसाठी तयार केलेले अंडरग्राउंड डक्ट भाड्याने देण्याच्या कामात दुबई, पाकिस्तानातील गुन्हेगारांशी संबंधीत कंपनीकडे काम सोपविण्याचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय शहरासाठी अत्यंत धोकादायक ठरू शकतो, महिला मुलिंची सुरक्षा संकटात येऊ शकते, डेटा चोरी, सायबर हल्ले होऊ शकतात असे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी निदर्शनास आणले होते. हा निर्णय तत्काळ रद्द करा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी महापालिका आयुक्त आयुक्त यांना भेटून दिला होता. चहुबाजुंनी त्याबाबत भाजपवर टीका होऊ लागल्याने सोमवारी (दि.२६) भाजपचे ढाके यांनी प्रसिध्दीपत्र काढून राष्ट्रवादी काँग्रेसवर `चोराच्या उलट्या बोंबा`, या कामात राष्ट्रवादीचाच छुपा हात आहे असे आरोप केले होते. त्यावर प्रसिध्दीपत्र काढून नाना काटे यांनी भाजपला चोख उत्तर दिले.

Lic
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय