Saturday, April 20, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडघरकुलकरांचे स्वप्न प्रत्यक्षात उतरणार घरकुल 'सोलर सिटी' होणार

घरकुलकरांचे स्वप्न प्रत्यक्षात उतरणार घरकुल ‘सोलर सिटी’ होणार

पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : मागील तीन वर्षांपूर्वी सामाजिक कार्यकर्ते अशोक मगर यांनी घरकुल मधील नागरिकांना दाखवलेले घरकुल सोलर सिटीचे स्वप्न प्रत्यक्षात उतरताना दिसून येत आहे. अशोक मगर यांच्या पाठपुराव्याने आणि कुदळवाडीतील व्यावसायिक सुरेश जाधव यांच्या अर्थसहाय्यातून आणि सहकार्यातून घरकुल मधील नवरंग सोसायटी C 17 या सोसायटीमध्येसुरेश विठ्ठल जाधव, भारती अशोक मगर यांचे हस्ते सोलर पॅनलचे पूजन करण्यात आले.

आता पर्यंत जवळ पास ९ इमारतीना सोलर पॅनल बसविले आहेत. यामुळे एका इमारतीचे महिन्याला येणारे दहा ते पंधरा हजार रुपये वीज बिल वाचत आहेत. यामध्ये सुरेश विठ्ठल जाधव यांच्या माध्यमातून चार सोसायटीमध्ये सोलर प्रोजेक्ट केला आहे. सोलर पॅनल मुळे नागरिकांची आर्थिक बचत होत आहे. या कार्यक्रमाला उपस्थित उदयसिंह पाटील यांनी सोलर मुळे विज बचतीचे महत्व सांगितले. 

या वेळी सतिश सोनटक्के, संतोष माळी, नवरंग सोसायटीच्ये अध्यक्ष- गफ्फार शेख सेक्रेटरी – रवींद्र लाडूक, खजिनदार राम खरात, संदीप सराफ, गुलनार पठाण, विमा लक्ष्मी, घोटलकी, आणि सभासद उपस्थित होते.

Lic
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय