Cabinet decision : मुंबईतील आठ रेल्वे स्थानकांची ब्रिटिशकालीन नावे बदलण्याच्या निर्णयास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. (Cabinet decision)
करी रोड रेल्वे स्थानकाचे नाव लालबाग रेल्वे स्थानक, सॅण्डहर्स्ट रोड रेल्वे स्थानकाचे नाव डोंगरी रेल्वे स्थानक, मरीन लाईन्स रेल्वे स्थानकाचे नाव मुंबादेवी रेल्वे स्थानक, चर्नी रोड रेल्वे स्थानकाचे नाव गिरगाव रेल्वे स्थानक, कॉटन ग्रीन रेल्वे स्थानकाचे नाव काळाचौकी रेल्वे स्थानक, हार्बरवरील सॅन्डहर्स्ट रोड रेल्वे स्थानकाचे नाव डोंगरी रेल्वे स्थानक, डॉक यार्ड रेल्वे स्थानकाचे नाव माझगाव रेल्वे स्थानक, किंग्ज सर्कल रेल्वे स्थानकाचे नाव तीर्थंकर पार्श्वनाथ रेल्वे स्थानक असे करण्यास मान्यता देण्यात आली.
विधिमंडळाची मान्यता घेऊन हा प्रस्ताव केंद्रीय गृह व रेल्वे मंत्रालयाकडे पाठविण्यात येईल.
हे ही वाचा :
केंद्र सरकारकडून 18 OTT प्लॅटफॉर्मवर बंदची कारवाई, ‘ही’ आहे लिस्ट
भारत जोडो यात्रेत माकप नेते माजी आमदार जे.पी.गावित यांना धक्काबुक्की
ब्रेकिंग : भाजपच्या लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, राज्यातील २० उमेदवारांचा सामावेश
अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलण्यास मंत्रिमंडळाची मान्यता, “हे” असणार नवे नाव…
ब्रेकिंग : आशा स्वयंसेविकांच्या मानधनात भरीव वाढ
मोठी बातमी : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले २७ महत्वाचे निर्णय
जुन्नर : घाटघर येथील एकाच कुटुंबातील ७ जणांना जन्मठेपेची शिक्षा