Thursday, April 24, 2025
---Advertisement---
---Advertisement---

PCMC : आण्णा बनसोडे यांचे यश टपरी, हातगाडीधारकांना प्रेरणादायी – काशिनाथ नखाते

पथारी, हातगाडी, स्टॉल धारकांकडून सन्मान (PCMC)

पिंपरी चिंचवड – पिंपरी चिंचवड शहरातून पिंपरी विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले पूर्वाश्रमीचे पानटपरी धारक आण्णा बनसोडे यांची विधानसभेचे उपाध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल पिंपरी चिंचवड शहरातील पानस्टॉल धारक, तसेच हातगाडी स्टॉल धारकांच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये अण्णा बनसोडे यांचा टपरीधारक ते विधानसभा उपाध्यक्ष असा प्रेरक प्रवास आहे असे गौरवोद्गार आज महासंघाचे अध्यक्ष तथा कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी काढले. (PCMC)

महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघ, कष्टकरी संघर्ष महासंघातर्फे आज त्यांचा सन्मान हातगाडी, स्टॉल धारकाकडून विविध प्रकारची फळे देऊन करण्यात आला.

यावेळी महाराष्ट्र महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते, कार्याध्यक्ष राजू बिराजदार मनपा समिती सदस्य किरण साडेकर,किसन भोसले, सलीम डांगे, अलका रोकडे,सहदेव होनमाने, फरीद शेख, सुनील भोसले, मनोज यादव,कौसर सय्यद,सुशेन खरात, नितीन भराटे,लाला राठोड अंबालाल सुखवाल नंदू आहेर, दिलीप मारणे, बालाजी लोखंडे आदी उपस्थित होते. (PCMC)

यावेळी अण्णा बनसोडे यांनी हातगाडी, स्टॉल धारकांसाठी आवश्यक ती मदत करू त्याचबरोबर त्यांच्या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी जे सहकार्य लागेल ते करण्यात येईल.
नखाते म्हणाले की अण्णा बनसोडे यांनी प्रतिकूल परिस्थिती मधून पान टपरी चालवून व्यवसाय केला आहे आणि नंतर राजकीय जीवनामध्ये यशस्वी झालेले असून त्यांचा प्रवास पाहता संघर्षमय असून हातगाडी स्टॉल धारकांसाठी प्रेरक असा प्रवास आहे .

---Advertisement---

राजकारणात येण्याआधी ते पान टपरी व्यवसाय करत असतानाच त्यांचा राजकारणाशी संबध येत गेला. पुढच्या काळात ते राजकारणात सक्रीय झाले. दरम्यान १९९७ मध्ये त्यांनी पहिल्यांदा महापालिकेची निवडणूक लढवली आणि ते नगरसेवक म्हणून निवडून आले. २००२ मध्ये पुन्हा ते नगरसेवक बनले. नगरसेवक असताना त्यांनी स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणूनही काम केलं आहे.
हातगाडी, पथारी, स्टॉलधारकांचा संघर्ष आजही सुरूच आहे. व्यवसाय वृद्धिंगत होण्यासाठी तत्पर असावे त्यांनी सुद्धा आपल्या जीवनामध्ये प्रयत्नशील राहिल्यास आवश्यक असकेल्या विषयात, प्रयत्नात ते ध्येय साध्य करू शकतो यात काही शंका नाही.

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles