आळंदी (अर्जुन मेदनकर ) : येथील आळंदी नगरपरिषद अंतर्गत दीनदयाळ जन आजीविका योजने अंतर्गत आळंदी शहर उपजीविका कृती आराखडा समितीची बैठक मुख्याधिकारी यांचे कक्षामध्ये उत्साहात पार पडली. (Alandi)
राज्य शासनाचे मार्गदर्शक सूचना प्रमाणे दीनदयाळ जन आजीविका योजना राबविण्याचे शासन स्तरावर ठरविण्यात आलेले आहे. या योजनेसाठी शहर उपजीविका कृती आराखडा तयार करण्यासाठी विविध शासकीय विभागा सोबत बैठक नगरपरिषदेत घेण्यात आली. यामध्ये दीनदयाळ जन आजीविका योजनेचा शहर उपजीविका कृती आराखड्या बाबत सविस्तर सुसंवाद साधून माहिती देण्यात आली.
या बैठकीत आळंदी शहरातील बांधकाम कामगार, केटरिंग कामगार, वाहतूक कामगार, स्वच्छ्ता क्षेत्रात काम करणारे कामगार, केअर वर्कर, घरगुती काम करणारे आदी असंघटीत कामगार विषयी तसेच रोजगार व स्वयंरोजगार उपलब्ध करण्यासाठी काय उपाय योजना करता येतील यावर प्राथमिक चर्चा करण्यात आली. (Alandi)
शहरातील विकासा पासून वंचित असलेल्या घटकांचे जीवनमान उंचावण्यासाठी काय करता येऊ शकते. याविषयी आपले विचार उपस्थितांनी व्यक्त केले. या बैठकीस नगरपरिषदेचे कार्यालयीन अधिक्षक श्रीमती अर्चना भिसे, सा. प्रकल्प अधिकारी श्रीमती वैशाली पाटील, समुदाय संघटक अर्जुन घोडे, MIT कॉलेज प्रा. अर्थशास्त्र श्रीमती अर्चना आहेर, MIDC प्रतिनिधी के.जी.पवार, अर्जुन मेदनकर, शहर स्तर संघ अध्यक्षा सुवर्णा काळे, सोनाली रत्नपारखी, पथविक्रेता समिती सदस्य संतोष सोनावणे, तुषार नेटके, महेश जाधव, श्रीमती काजल धोंडगे तसेच आळंदी नगरपरिषदेचे सर्व विभाग प्रमुख, इतर कार्यालयाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
या बैठकीचे प्रास्ताविक सा. प्रकल्प अधिकारी वैशाली पाटील यांनी कृती आराखड्याची माहिती देत केले. बैठक यशस्वीतेवी साठी समुदाय संघटक अर्जुन घोडे यांनी परिश्रम घेतले. आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी माधव खांडेकर याचे मार्गदर्शनाखाली सूचना देशा प्रमाणे शहर उपजीविका कृती आराखडा समिती ची बैठक उत्साहात झाली.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपापले विचार व्यक्त करीत कृती आराखड्याचे अनुषंगाने संवाद साधून सूचना करीत मनोगते व्यक्त केली.