Friday, April 18, 2025
---Advertisement---
---Advertisement---

सीए हा अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा दुवा – चंद्रकांत पाटील

पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : सीएचे कार्य फक्त प्राप्तीकर विवरणपत्र भरणे इतक्यांतपुरतेच मर्यादीत राहिले नसून, आज सीए हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा दुवा बनला आहे. असे उदगार उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काढले. निगडी येथील आयसीएआय पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ज्ञान संवाद या सीए विद्यार्थी परिषदेत ते बोलत होते.

---Advertisement---



या परिषदेचे उदघाटन प्रसंगी सीए इंस्टिट्यूटचे केंद्रीय कौंसिल सदस्य सीए मंगेश किनरे, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे सहाय्यक शहर अभियंता मनोज शेठिया, सीए परिषद संचालक पियुष छाजेड, रीजनल कौंसिल विकासा अध्यक्षा पिंकी केडीया, रीजनल कौंसिलचे माजी सदस्य अशोककुमार पगारीया, आयसीएआय पिंपरी चिंचवड शाखाध्यक्ष सीए सचिन बंसल, उपाध्यक्ष पंकज पाटणी, विकासाचे अध्यक्ष वैभव मोदी, अक्षय बाहेती, खजिनदार शैलेश बोरे, सचिव सारिका चोरडिया, माजी अध्यक्ष विजय बामणे, कार्यकारी सदस्य सचिन ढेरंगे आदी उपस्थित होते.

ना. पाटील पुढे म्हणाले कि, आपले आयुष्य सुखकर व्हावे या हेतूने आपण अभ्याक्रम निवडतो जेणेकरून उत्तम सरकारी नोकरी, पगार, चांगली पत्नी मिळावी. मात्र आज प्रशासकीय सेवेत नोकरी करून एक देशसेवा किंवा समाजसेवा करावी या हेतूने नोकरी निवडत नाही. हि शोकांतिका आहे. पूर्वी नोकरशाही पद्धत रूढ होती. मात्र आता गरीब घरातील देखील तरुण नोकरीपेक्षा व्यवसायाकडे वळत आहे. व्यापार – व्यवसाय वाढल्याने देश सक्षम बनत आहे. सीए ने व्यवसाय जोपासताना सामाजिकता जपली पाहिजेत. ते शेवटी म्हणाले, दोन दिवशीय परिषदेत देशभरातून ५०० सीए विद्यार्थी सहभागी झाले होते. प्रास्ताविक भाषण विकासाचे अध्यक्ष वैभव मोदी यांनी केले. सुत्रसंचालन रुची बंसल, निधी कट्टी यांनी तर आभार पंकज पाटणी यांनी मानले.

हे ही वाचा :

---Advertisement---

टोमॅटोने मोडले आता पर्यतचे पेट्रोल डिझेलचे सर्व रेकॉर्ड, अनेक शहरांत टोमॅटो 150 पार

ऑनलाईन गेम खेळताना प्रेम जडलं, 4 मुलांची आई प्रियकरासाठी थेट पाकिस्तानातून भारतात

अखेर ‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या लेखकाने मागितली प्रेक्षकांची जाहीर माफी

धक्कादायक : मंत्र्यांच्या स्वागतासाठी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांना तब्बल दोन तास रस्त्यावर केले उभे

‘हा आपल्या दोघांतील मुलभूत फरक’ खा. कोल्हेंचे आढळराव पाटील यांना प्रत्यूत्तर

ब्रेकिंग : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, ठाकरे गटाच्या बड्या महिला नेत्या शिंदे गटात

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिकांच्या निवडणुकीचा बिगूल वाजणार?

ब्रेकिंग : 9 आमदार आणि 3 खासदार निलंबित; महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोडी

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles