Friday, May 17, 2024
Homeनोकरीब्रेकिंग : राज्यातील पोलीस भरतीची तारीख ठरली, पहा कधीपासून ?

ब्रेकिंग : राज्यातील पोलीस भरतीची तारीख ठरली, पहा कधीपासून ?

मुंबई : राज्यात हजारो तरूण, तरूणी पोलिस भरतीची तयारी करत आहेत. परंतु भरती कधी होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी मोठे वक्तव्य केले आहे.

राज्यात सध्या 50,000 पोलीस पदे रिक्त आहेत. सध्या साडे पाच हजार पदांची भरती पूर्ण होत आली आहे. तर सात हजार पदांची भरती काढली जाणार आहे. जूनच्या १५ तारखेपासून ही प्रक्रिया सुरु केली जाणार आहे. यानंतर राज्य मंत्रिमंडळासमोर आणखी १५ हजार पदे भरण्यासाठी प्रस्ताव सादर केला जाणार आहे, असे वळसे पाटील म्हणाले. ही मोठी भरती करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळ नक्कीच परवानगी देईल. पोलिसांवर खूप ताण आहे, तो कमी करण्यासाठी ही भरती गरजेची असल्याचे वळसे पाटील म्हणाले. याबाबतचे सविस्तर वृत्त दैनिक लोकमत ने दिले आहे.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

SRPF : राज्य राखीव पोलीस दलात नवीन भरती, 12 पास विद्यार्थ्यांसाठी संधी !

पोलिस दलात नवीन भरती सुरू, आजच करा अर्ज !

जिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद येथे रिक्त पदांसाठी भरती, आजच करा अर्ज !

इंडियन बँक मध्ये 312 रिक्त पदांसाठी भरती, 36000 ते 76000 रूपये पगाराची नोकरी


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय