अहमदाबाद बडोदा एक्सप्रेस वेवर शुक्रवारी (२३ फेब्रुवारी) रात्रीच्या सुमारास एका खासगी बसचा भीषण अपघात झाला. प्रवाशांनी खचाखच भरलेली बस रेलिंग तोडून २५ फूट दरीत कोसळली.या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर काही प्रवासी जखमी झाले आहेत.जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त खासगी बस गुजरातच्या अहमदाबाद येथून पुण्याच्या दिशेने येत होती. या बसमधून जवळपास २३ प्रवासी प्रवास करीत होते.
शुक्रवारी रात्री बस अहमदाबाद-वडोदरा एक्स्प्रेस वेवरवर आली असता, सिमेंटचा टँकर अचानक गाडी वळल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण (Bus Accident) सुटले. काही क्षणातच बस रेलिंग तोडून २५ फूट दरीत कोसळली. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला.दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. उशिरापर्यंत मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू होते. याप्रकरणी पोलिसांनी टँकरचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.