नवी दिल्ली : माजी राष्ट्रपती ‘भारतरत्न’ प्रणव मुखर्जी यांचं निधन झालं आहे. ते 84 वर्षाचे होते. कोरोना आणि वाढत्या वयामुळं त्यांना 10 ऑगस्ट रोजी रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आपला कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्या नंतर त्यांनी स्वतः ट्विट करून सांगितलं होतं कि, संपर्कात आलेल्यांनी टेस्ट करून आयसोलेट होण्याचे देखील त्यांनी आवाहन केलं होतं.
प्रणव मुखर्जी हे दीर्घ कोमात गेल्याचं नंतर हॉस्पीटलनं सांगितलं. तेव्हापासून मुखर्जी यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक होती. अखेर आज 31 ऑगस्ट (सोमवार) त्यांचं निधन झालं आहे.
10 ऑगस्टच्या रात्री त्यांच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यावेळी त्यांना व्हेंटिलेटर सपोर्ट देण्यात आला होता. शस्त्रक्रिया यशस्वी झाली मात्र व्हेंटिलेटर सपोर्ट कायम ठेवावा लागला होता. 11 ऑगस्ट रोजी हॉस्पीटलनं मुखर्जी यांची प्रकृती क्रिटिकल असल्याचं सांगत ते व्हेंटिलेटरवर असल्याचं स्पष्ट केलं होतं.
काँग्रेसचे दिग्गज नेता म्हणून राजकीय प्रवास करणारे प्रणव मुखर्जी हे 2012 ते 2017 दरम्यान देशाचे राष्ट्रपती होते. सन 2019 मध्ये त्यांना केंद्र सरकारनं भारत रत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देवुन सन्मानित केलं होतं.