Wednesday, May 22, 2024
Homeआरोग्यसांगोल्यातील आरोग्य सेवा ढिसाळ : तुकाराम शेंडगे

सांगोल्यातील आरोग्य सेवा ढिसाळ : तुकाराम शेंडगे

ता:सांगोला

              सामाजिक कार्यकर्ते हिंदुस्थान प्रजा पक्षाचे राज्य प्रवक्ते तुकाराम केशवराव शेंडगे यांनी सांगोल्यातील चाळीस गावांचा दौरा केला . दौऱ्यानतंर ते पत्रकार परिषदेत बोलत असताना सांगोल्यातील आरोग्य यंत्रणे वर तशोरे ओढले .

         सांगोल्यात जनतेला वाली कुणीच नाही, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनता स्वतःच अत्मनिर्भर आहे,त्याचबरोबर तालुक्यात  कोवीड-19 कोरोना रोग व त्याविषयी जागृती करणेही आवश्यक आहे.

तालुक्याचा विचार करता रुग्ण संख्येचा आलेख वाढत आहे,जनतेत कोरोना रोगाची प्रचंड भीती आहे,

राज्य शासनाने कडे कोरोना रोगाला  प्रतिबंध घालण्यासाठी अतिरिक्त फंड किंवा सी एस आर फंड व त्याच बरोबर सांगोला या ठिकाणी एक मध्यवर्ती कोवीड-19 चे हॉस्पिटल              लोकप्रतिनिधी ने मागायला हावे, जेणेकरून रुग्णांची व नातेवाईकांनची, सोलापुर पर्यंत फरफराट होणार नाही.

 तालुक्यातील जनतेचे कौतुक करत जनता स्वाभिमानी आहे,कुठल्याही ठोस उपाययोजना नसताना लोक स्वतःच अत्मनिर्भर आहेत,कोरोना रोग महाभयानक नाही घाबरायचे काही कारण नाही औषध व लस ऊपलब्ध नसतानाही लोक बरे होत आहेत फक्त सामाजिक अंतर व काळजी घेण्याची गरज आहे हे आव्हान जनतेला करत तुकाराम शेंडगे यांनी लोकप्रतिनिधींचे नाव न घेता चांगलेच कानटोचले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय