Saturday, May 18, 2024
Homeविशेष लेखसमाजवादी भारताचं स्वप्न पाहणारे काॅम्रेड अण्णा भाऊ

समाजवादी भारताचं स्वप्न पाहणारे काॅम्रेड अण्णा भाऊ

काॅम्रेड अण्णा भाऊंचा जन्म 1 आॅगस्ट 1920 रोजी वाटेगांव या छोट्याशा गावात झाला.  आज 1 आॅगस्ट 2020 रोजी त्यांच्या जन्माला 100 वर्षे पुर्ण होत आहेत.  त्या निमित्ताने हा लेख प्रपंच.

काॅम्रेड अण्णा भाऊंनी मार्क्सवादावर अढळ निष्ठा ठेवत कष्टकरी चळवळ, साहित्य तसेच श्रमिकांच्या सांस्कृतिक जगाला उंच शिखरावर पोहचवले.   अण्णा भाऊ यांचे स्थान साहित्य वाड्मय अनं सांस्कृतिक क्षेत्रात अत्यंत महत्वाचे आहे.  त्यांचे एकूण आयुष्य 49 वर्षांचे राहिले परंतू साहित्याच्या विविध अगांनी त्यांनी केलेले लिखान आजच्या घडीला देखील तितकेच प्रेरक, लढ्याला दिशा देणारे, मार्क्सवादी वर्गीय दृषि्टकोनातून वर्गकलह मांडणारे असे आहे. स्वतः  लढावू बाणा असणारे अण्णा भाऊ त्यांच्या साहित्यात लढाऊ, उमद्या मनाचे,  खूला संघर्ष करणारे नायक-नाईका उभ्या करातात.  अण्णा भाऊंच्या साहित्यातील नायक नाईका ह्या स्वाभीमानी,  करारी,  बानेदार, स्वतःच्या शिलावर प्रेम करणाऱ्या आणि महत्वाचे म्हणजे सुंदर, देखण्या अनं रूबाबदार असे आहेत.   अण्णा भाऊ आपल्या लिखानातून अर्थिक समते सोबत सामाजिक समतेची मागणी करतात.  त्यांनी त्यांच्या लिखानातून जातीअंताची हाक दिली आहे.  त्यांच्या पोवाड्या मध्ये त्यांनी श्रमिकांच्या हाताला वंदन केले आहे.  ते त्यांच्या पोवाड्यातूनही श्रमिकांना क्रांतीच्या वाटेकडे घेवून जातात.  अण्णा भाऊंचे लिखान हे जागतिक दर्जाचे असल्याने देशाच्या सिमा ओलांडून ते बाहेर पडले.

कथाकार,  कांदंबरीकार, नाटक लेखक, शाहिर,  लोकनाट्याचे जनक,  प्रवासवर्णणकार,  चित्रपट, नट अशा विविध अगांनी काम करणारे अण्णाभाऊ हे केवळ बुध्दीवंतच नव्हते तर ते कामगारांमध्ये काम करणारे एक कम्युनिस्ट पक्षाचे तळमळीचे कार्यकर्तेही होते.  अण्णा भाऊ आजही आंबेडकरी व मार्क्सवादी विचारधारेचा मजबूत पूल मानले जातात.  शोषीत चळवळीच्या सांस्कृतिक जगाची पाया भरणीच कॉम्रेड अण्णा भाऊ, काॅम्रेड अमर शेख, कॉम्रेड गव्हाणकर यांनी  केली असं म्हणलं तर वावग ठरणार नाही.

देशाचा स्वातंत्र्य लढा आणि सोबतंच संयुक्त महाराष्ट्राच्या रणसंग्रामात स्वतःला झोकूण देवून काम करणारे अण्णाभाऊ एक हाडाचा कार्यकर्ता, क्रांतिकारी नेता म्हणून आपणाला दिसतात.   तसेच ते दुष्ट, अनिष्ट प्रथापरंपरा,  रितीरिवाज यांना नकारणारे व जून्या व्यवस्थेला लाथाडून नव्या मूल्यांना नव्या समाज व्यवस्थेला स्विकारणारे विवेकी लेखक होते.

दारिद्र्य क्रुर व नागडं असतं ते लपवता येत नाही अशी अण्णा भाऊंची भूमिका होती.   त्यामुळे या क्रुरते विरूध्द अण्णा भाऊ आपल्या लिखान व जगण्यातून उभा संघर्ष पुकारतात.  व त्यामुळेच समतेच्या मार्क्सवादी विचारांची कास धरतात. 

अण्णाभाऊंनी दारिद्र्य, समाजाच्या उपेक्षेचे चटके,  वेठबिगारी, पिळवणूक,  कष्टप्रद दुःखी जिवण अनुभवले होते. त्यामुळे शोषणविरहित समाजरनेच्या ते प्रेमात पडले होते.  त्यातूनच नव्या जगाची आस घेवून अण्णाभाऊ सतत त्यांच्या लिखाणातून, कृतीतून संघर्षरत असलेले दिसतात.    त्यांनी स्विकारलेला कम्युनिस्ट विचार हा त्यांच्या कृतीला दिशा देणारा ठरला.  अण्णाभाऊंनी संपूर्ण हयात मार्क्सवादी विचारधारा स्विकारून काम केल्याने मार्क्सवादी विचाराच्या संघर्षातून निर्माण झालेले जग नेमके कसे असते याचा विचार ते करीत रहिले.  मार्क्सवादी विचारांच्या संघर्षातून निर्माण झालेल्या समाजवादी रशियाबद्दल यामूळे काॅम्रेड अण्णाभाऊंना तिव्र ओढ निर्माण झाली.  आणि त्यांनी त्यांचे समाजवादी जग पाहण्याचे स्वप्न समाजवादी रशियात जावून ´समाजवादाचं यश´ पाहूण पूर्ण केले.   अण्णा भाऊ मार्क्सवादी जागाच्या किती प्रेमात पडले होते हे त्यांच्यांच शब्दांतून बघू,  ते म्हणतात,  “आपण वाटेल ते करून एकवेळ सोविएत संघराज्य पाहावे, असं मला फार वाटत होतं.   ती आशा माझ्या मनात दिवसेंदिवस सारखी प्रबल होत होती.   रशियातील ते कामागार राज्य कसे असेल,  तिथं काॅम्रेड लेनिननं केलेली क्रांती,  मार्क्सचे महान तत्वज्ञान कसे साकार झाले असेल,  ती नवी दुनिया,  नी संस्कृती,  नवी सभ्यता कशी फुलत असेल,  या विचारांनं माझं मन भरावलं होतं.  मी वेडाच झालो होतो.”

समाजवादी भारत निर्माण व्हावा यासाठी विचार,  लिखान व संघर्षाची धार तिव्र करणाऱ्या अण्णा भाऊंनी पाहिलेला समाजवादी रशिया त्यांनी ´ माझा रशियाचा प्रवास´ या प्रवासवर्णनात अगदी नेटक्या शब्दांत मांडला आहे.

अण्णा भाऊं म्हणतात,  “मी सन 1934 च्या दम्यान अनेक जप्त पुस्तके वाचली होती. रशियन क्रांतीचा इतिहास,  काॅम्रेड लेनिनचे चरित्र या पुस्तकांनी माझ्या मनावर खुप परिणाम केला होता.  आणि म्हणूनच मी रशिया पाहण्यासाठी उत्सुक झालो होतो.   कसंही करून एकदा रशियाकडे सरकावं असा माझा विचार झाला होता.”  त्यासाठी त्यांनी दोनदा पासपोर्ट मिळावा यासाठी अर्ज केला होता,  सिनेनट बलराज सहानी यांनी पॅरिसपर्यंतची तिकिटेही काढली होती,  परंतू कम्युनिस्ट विरोधी राजकारण आडवे आल्याने त्यांना ते शक्य झाले नाही.  पुढे 1961 मध्ये ´फकिरा´ कादंबरीस राज्य सरकारचा पुरस्कार मिळाल्यानंतर इंण्डो सोविएत कल्चरल सोसायटीनं रशियाला जावं असं ठरवले व त्या संस्थेने अण्णा भाऊंना पत्र देवून रशिया भेटीची निमंत्रण दिले, व अण्णा भाऊ समाजवादी रशियाच्या प्रवासावर निघाले.

एकूणच कॉम्रेड अण्णा भाऊंचा जिवन संघर्ष हा सामाजिक, आर्थिक,  सांस्कृतिक,  राजकीय समतेसाठी होता.    काॅम्रेड अण्णा भाऊ समाजवादी भारताचं स्वप्न पाहणारे नेते होते. आजच्या परस्थितीत निर्माण झालेल्या प्रश्नांवर देखील त्यांचे चरित्र, लिखान, विचार प्रेरक व मार्गदर्शक व चळवळींच्या कार्यर्त्यांचा उत्साह वाढवणारे आहे.

लेखक- प्रविण मस्तुद, बार्शी, जिल्हा सोलापूर 9960312963 
मेल- [email protected]
लेखक- पीएच.डी. संशोधक विद्यार्थी आहेत.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय