कोल्हापूर(प्रतिनिधी):- गेल्या दोन वर्षापासून वृक्ष प्रचंड प्रमाणात रस्ता रुंदीच्या नावाखाली तोडले गेले त्यानंतर दुसरी लाट आली ती वीज वितरण कंपनीची. विजेच्या तारेला स्पर्श करणाऱ्या फांद्या तोडणे उचित होते पण त्यांनी मुळापासूनच जुने वृक्ष तोडून टाकले आहेत की जेणेकरून ते वृक्ष मरतील किंवा पुढे दहा वर्ष तारे पर्यंत त्यांच्या फांद्या येऊ शकत नाहीत. शिवारामध्ये तुम्ही फिराल अनेक शेतकरी आपल्या बांधावरचे जुने वृक्ष तोडू लागले आहेत. त्यामुळे सारा परिसर उजाड वाटत असून दुपारी न्याहारीच्या वेळी बसतो म्हटलं तरी झाडाची सावली आज उपलब्ध नाही .जर अशीच कत्तल होत राहिली तर आज कोरोना सारखी महामारी आलेली आहे तशा अनेक महामारी वेगवेगळ्या स्वरूपात मानवाच्या जीवावर बेतील, असे ज्येष्ठ विचारवंत डॉ.सुभाष देसाईंंनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे म्हटले आहे.
ग्लोबल वॉर्मिंग वाढत आहे. तापमान वाढीमुळे ध्रुवावरील बर्फ वितळून समुद्राची पाण्याची पातळी वाढत आहे .रशियामध्ये सायबेरिया मध्ये दोन मीटर उंचीची समुद्राची लाट आली. त्यामध्ये बर्फ खंड अनेक मोठ्या प्रमाणामध्ये वाहत वाहत शेती ,शेतकऱ्यांची घरे मोठ्या प्रमाणात नुकसान करून गेली. संपूर्ण पृथ्वीचा विनाश रोखायचा असेल तर गावातल्या तरुणांनी शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपन्यांनी आणि रस्ता रुंदीकरण करणारे सार्वजनिक बांधकाम किंवा त्या कॉन्ट्रॅक्टरने नवे वृक्ष त्वरित लावण्याची गरज आहे याबाबत तरुण शेतकऱ्यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे, असेही जाधव यांनी म्हटले आहे.