Thursday, December 12, 2024
Homeआरोग्यकोरोनामास्क न वापरणे व रस्त्यावर थुंकणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई--जिल्हाधिकारी राहुल रेखावार

मास्क न वापरणे व रस्त्यावर थुंकणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई–जिल्हाधिकारी राहुल रेखावार

(बीड) सार्वजनिक स्थळी थुंकणे, चेहऱ्यावर मास्क न लावणे, सोशल डिस्टन्स न पाळणाऱ्या नागरिकांवर होणार दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत.

       

सार्वजनिक स्थळी रस्ते, बाजार,रुग्णालय, कार्यालय येथे प्रथम थुंकल्याचे आढळून आल्यास प्रथम त्या नागरिकांना 1हजार रुपये दंड दुसऱ्या वेळेस  फौजदारी कारवाई.

चेहऱ्यावर मास्क न वापरणे प्रथम वेळ 500 रुपये दंड,  दुसऱ्यांदा फौजदारी कारवाई.

दुकानदार, फळ भाजीपाला विक्रेते, सर्व जीवनावश्यक वस्तू विक्रेते व ग्राहकांनी सोशल डिस्टन्स न राखणे, आस्थापना ,मालक, दुकानदार ,विक्रेता यांना प्रथम 200 रुपये दंड दुसऱ्यांदा फौजदारी कारवाई आणि  ग्राहकांमध्ये कमीत कमी 3 फूट अंतर न राखणे ,ग्राहक व्यक्तीस  200 रुपये दंड

 किराणा, जीवनावश्यक वस्तू विक्रेत्याने वस्तूचे दर पत्रक न लावणे, प्रथम 5 हजार रुपये दंड ,दुसर्‍यांदा फौजदारी कारवाई,

सार्वजनिक स्थळे ,रस्ते ,बाजार ,कार्यालय, रुग्णालये इत्यादी ठिकाणी एखादी व्यक्ती अंदाजे 18 वर्षापेक्षा कमी किंवा अंदाजे 60 वर्षापेक्षा जास्त वयाच्या व्यक्तीसोबत आढळून आल्यास प्रथम एक हजार रुपये दंड व दुसऱ्यांदा फौजदारी कारवाई.

 एखादी व्यक्ती दुचाकीवरून वैयक्तिक वापरासाठी चा भाजीपाला, किराणा इत्यादी घेऊन जात असल्यास प्रथम 1  रुपये दंड दुसऱ्यांदा फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे.

        या आदेशांचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने भारतीय दंड संहिता 160 चे कलम 188 शिक्षेस पात्र असलेला अपराध केला आहे असे मानण्यात येईल. राज्य शासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी साथरोग कायदा 1897 दिनांक 13 मार्च 2020 पासून लागू केला आहे. जिल्ह्यात 30 जून 2020 रोजीच्या आदेशान्वये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता फौजदारी प्रक्रिया दंड संहिता 1973 चे कलम 144 (1)(3) लागू करण्यात आले आहे.

 या नियमांचे उल्लंघन  व ही  गैरकृत्ये  करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यासाठी नगर परिषद , नगर पंचायत,  ग्राम पंचायत आदी  आणि संबंधित शासकीय विभागांचे अधिकारी  यांना अधिकार देण्यात आले असून नियुक्त केलेल्या अधिकारी-कर्मचारी यांनी आवश्यकतेनुसार फोटोग्राफी ,व्हिडिओ ग्राफी, मोबाईल द्वारे करावी याकरिता स्थानिक स्वराज्य संस्था यांनी पोलीस विभागाची मदत घ्यावी. अशा सूचना केल्या आहेत.

संबंधित लेख

लोकप्रिय