Sunday, January 12, 2025
HomeNewsजनतेचे मनोरंजन करणाऱ्या कलाकारांना शिक्षकांनी दिला मदतीचा हात!

जनतेचे मनोरंजन करणाऱ्या कलाकारांना शिक्षकांनी दिला मदतीचा हात!


कोल्हापूर(प्रतिनिधी) :-

             कोरोनाच्या प्रादुर्भावाने संपूर्ण जगाला हादरून टाकले आहे. या परिस्थीतीमध्ये सर्वात अधिक फटका बसला तो दररोज मिळवून खाणाऱ्या कष्टकऱ्यांना. त्यामधून कलाकारही सुटले नाहीत. मार्च, एप्रिल, मे कलाकारांचा तर मुख्य सीझन होता. परंतू याच कालावधीत त्यांना घरी बसावे लागेेल. अशा परिस्थितीत त्यांच्या पोटा पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता.

                कलाकार नेहमी दुसऱ्यांचे दुःख दूर करणारे, सर्वांचे मनोरंजन करणारे आज मात्र त्यांच्याच डोळ्यात अश्रू उभे  राहीले आहेत. अशा परिस्थितीत शिक्षक बांधवानी या कलाकार मंडळीना मदत हात दिला. कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेमार्फत तातडीची मदत म्हणून पाच हजार रुपयाची मदत म्यूझीक असोसिएशन ऑफ कोल्हापूर यांचेकडे सूपूर्द करण्यात आली. याप्रसंगी पतसंस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते

संबंधित लेख

लोकप्रिय