पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) – येथील रस्टन कॉलनी येथे श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण सोहळा गुरुवार दिनांक 9 जानेवारी रोजी सकाळी 7.30 ते दुपारी 3.30 या वेळात अत्यंत उत्साहात आणि धार्मिक वातावरणात संपन्न झाला. (PCMC)
त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. महाप्रसादाचा लाभ सर्व भक्तांनी घेतला .
पारायण सोहळ्याचे मुख्य व्यासपीठ प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य मुखोद्गत पारायण कर्ते डॉ. गजानन खासनीस होते.
डॉक्टर गजानन खासनीस यांचे मधुर वाणीतून पारायण सोहळा संपन्न झाला, या दरम्यान त्यांनी मोबाईल शाप की वरदान तसेच अनेक साधू संत त्यांचे ग्रंथ इत्यादि विषयी अत्यंत सुंदर शब्दात निरूपण केले.
मूळ ग्रंथाचा आधार घेऊन त्याचे विवेचन आपण केले पाहिजे सर्व धर्म समभाव इत्यादि विषयी जागृती करण्यात आली.
या निमित्ताने पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय येथील वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद पवार यांनी भेट दिली.
PCMC
तसेच समाजातील अनेक धार्मिक सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते माजी नगर सदस्य राजेन्द्र गावडे तसेच अश्विनी चिंचवडे उपस्थित होत्या.
पारायण मध्ये सुमारे 100 ज्येष्ठ आणि तरुण वर्गातील भक्तांनी सहभाग घेतला. (PCMC)
रस्टन कॉलनी येथील बाळासाहेब नवले, सुभाष मालुसरे, विजय पाटील,मोहन वायकुळे, नंदु घोडेगावकर, हरिभाऊ क्षिरसागर, महेश जाधव, दादा सुतार, कैलास भंडारी, तुळशीराम पाटील, मुकेश गुजराथी आणि इतर कार्यकर्ते यांनी विशेष परिश्रम घेतले.
याकामी चिंचवड येथील गजानन सत्संग मंडळाचे विशेष सहकार्य मिळाले.
PCMC : चिंचवड येथे रस्टन कॉलनी यांचे वतीने 19 वा श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण सोहळा संपन्न
- Advertisement -