वडवणी: (प्रतिनिधी)
वडवणी शहरातील लोकमान्य टिळक महाविद्यालयात बारावीच्या कला, विज्ञान, वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन तासिका सुरू करण्यात आल्या आहेत. तसेच बीए ,बीएससी, बीकॉम द्वितीय आणि तृतीय वर्षाच्या ऑनलाईन ताशीका सुरू करण्यात आल्या आहेत, अशी माहिती प्राचार्य डॉ. के. एम. पवार यांनी दिली.
प्राचार्य डॉ. के. एम. पवार म्हणाले की सद्य:स्थिती पाहता पूर्वीप्रमाणे महाविद्यालय कधी सुरू होईल हे निश्चित सांगता येत नाही. दरम्यान शहरी विद्यार्थ्यांच्या तुलनेत ग्रामीण विद्यार्थी मागे पडू नये, आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये ,यासाठी महाविद्यालयाचे अध्यक्ष पंजाबराव मस्के कार्यवाह अमरसिंह मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली ऑनलाइन तासिका सुरू करण्याचे नियोजन पूर्ण झाले आहे.
तसेच बारावी विज्ञान, कला , वाणिज्य या वर्गाच्या ऑनलाइन ताशिका सुरू करण्यात आल्या आहेत.
ताशीकेसाठी झूम, गुगल मिट, गुगल क्लासरूम, व्हॉट्सऍप ग्रुपचा वापर करण्यात येत आहे. या ताशीका सुरू करण्यासाठी प्रा.सतीश भालेराव,प्रा.संजय साळुंके, विज्ञान शाखेच्या प्रमुख प्रा. प्रतिभा शेळके, कनिष्ठ विभाग प्रमुख प्रा. गोपीचंद घायतिडक प्रा.जी.के. घोडेराव प्रा. नागनाथ साळुंके प्रा. गोपाळ मस्के, प्रा.ज्ञानेश्वर शेंडगे प्रा.रामेश्वर पवार प्रा. अंकुश पवार हे प्राचार्य डॉ.के.एम. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मेहनत घेत आहेत.