Friday, November 22, 2024
Homeआरोग्यकोरोनाकामगार संघटनांच्या मागणीला यश, शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत घेतला हा महत्वपूर्ण निर्णय

कामगार संघटनांच्या मागणीला यश, शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत घेतला हा महत्वपूर्ण निर्णय

नाशिक(प्रतिनिधी) :- कोरोनाच्या साथीमध्ये सर्वेक्षण, शोध, माग काढणे, प्रतिबंध, चाचणी, उपचार व मदत कार्य यांचेशी संबंधित कर्तव्य बजावित असताना शासनाच्या विविध विभागातील, प्रवर्गातील कर्मचारी यांचा कोरोना विषाणूशी जवळून संबंध येत आहे. अशा कर्मचाऱ्यांंच्या दृष्टीने शासनाने ५० लाख रकमेचे सर्वंकष वैयक्तिक अपघात विमा कवच पुरविण्याची मागणी सातत्याने सिटूसह अन्य कामगार संघटना करत होत्या.

            शासनाने आरोग्य सेवा कर्मचारी संबंधित आणि त्या व्यतिरिक्त जिल्हा प्रशासन, पोलीस, होमगार्ड, आंगणवाडी कर्मचारी, लेखा व कोषागारे, अन्न व नागरी पुरवठा, पाणी पुरवठा व स्वच्छता, घरोघरी सर्वेक्षणासाठी नेमलेले अन्य विभागांचे कर्मचारी मोठ्या कोव्हीड-१९ बाबत जबाबदारी पार पाडत आहे. त्या कर्मचाऱ्यांना 50 लाखाचे विमा कवच लागू करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. आम्ही या निर्णयाचे स्वागत करत असल्याचे सिटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ.डी.एल.कराड म्हणाले.

विमा योजना कार्यान्वित होईपर्यंत अंतरिम अंतरिम उपाययोजना म्हणून कोव्हिड विषयक कर्तव्यावरील  कर्मचाऱ्यांंच्या मृत्यूच्या सर्व प्रकरणी ५० लाख रकमेचे सानुग्रह सहाय्य खालील अटींच्या अधीन प्रदान करण्यात येेणार आहे. 


 १. सदर कर्मचारी त्याच्या इस्पितळात दाखल होण्याच्या अथवा मृत्यूच्या दिनांकांपूर्वी १४ दिवसांच्या काळात कर्तव्यावर हजर असला पाहिजे . 

 २. सदर मृत्यू कोव्हिड -१९ शी संबंधित असल्याबाबतचे वैद्यकीय प्रमाणन, शासकीय-पालिका-महानगरपालिका, आय.सी.एम.आर नोंदणीकृत खाजगी इस्पितळ-प्रयोगशाळा यांचेकडून प्राप्त अहवालाच्या आधारे करण्यात येईल.

 ३. “कर्मचारी” यांमध्ये सर्व कंत्राटी, बाह्यस्त्रोतांद्वारे घेतलेले, रोजंदारी, मानसेवी कर्मचाऱ्याचा समावेश असणार आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय