(मुखेड/प्रतिनिधी) मुखेड तालुक्यातील खरब खंडगाव, बोरगाव, मडलापूर ते पाळा जाहूर या 15 किमी रस्त्याची गेल्या दोन वर्षापासुन अत्यंत दयनिय अवस्था झाली आहे रस्त्यात खड्डे की खड्यात रस्ता हेच कळत नाही दोन वर्षापांसुन या रस्त्याने प्रवास करणे अंत्यत धोकादायक झाले आहे या रस्त्याने वाहण चालवणाय्रा चालकाना तारेवरची कसरत करावी लागत आहे तर प्रवाशांना जिव मुठ्ठीत धरूण प्रवास करावे लागत आहे. रस्त्यावर पडलेल्या खड्यात पावसाचे पाणी साचून स्विमींग फुलच तयार झाले आहे. मात्र याकडे आजपंर्यत ना सा.बा. विभागाने लक्ष दिले ना लोकप्रतिनिधीने लक्ष दिले त्यामुळे हा रस्ता गेल्या दोन वर्षापांसुन रखडलेला आहे एखादा मोठा अपघात होऊन प्रवाशाचे जिव गेल्यावर च सा .बा.विभागाचे व लोकप्रतिनिधीचे डोळे उघडतील का असा ही प्रश्न नागरिक करत आहेत. मुखेड हे तालुक्याचे व मोठे बाजरपेठाचे ,तसेच शाळा, काँलेज, महाविद्यालय व उपजिल्हा रूग्णालयाचे शहर तसेच प्रसिध्द सर्प तज्ञ्नं पुडे हाँस्पिल हे मुखेड लाच असल्यामुळे असंख्य ग्रामीण भागातील सर्पदंश झालेले रूग्ण तात्काळ पुंडे हाँस्पिटल गाठण्याचा प्रयत्न करत असातात. त्यामुळे या रस्त्याने ग्रामीण भागातील नागरिकांची मोठी वरदळ असते मात्र रस्त्यावर पडलेल्या खड्याने रूग्णाची मोठी हेळसांड होते वेळेवर रूग्ण पोहचत नसल्याने रूग्णाचे जिव ही जाऊ शकते .त्यामुळे मुखेड चे लोकप्रिय आमदार डाँ.तुषार राठोड हे याकडे लक्ष देतील का असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.
तर बोरगाव पांसुन शाँटकट असलेला केरूर, तांदळी, तांदळी तांडा, उमरदरी, मुखेड या 10 किमी रस्त्याचे रूदींकरण होत असल्याने हा रस्ताही संपुर्ण उखरूण ठेवण्यात आले आहे त्यामुळे पाऊस पडल्यावर या रस्त्यावर चिखल मोठ्या प्रमाणात होत आहे आणि रस्ताही पुर्णपणे उखरूण ठेवल्यामुळे या रस्त्याने प्रवास करणे ही घातक झाले आहे त्यामुळे मुखेड ला जावे कसे हा मोठा प्रश्न प्रवाशांना पडला आहे. त्यामुळे दोन्ही मार्गापैकी कोणाता तरी एक मार्ग प्रवाशांना जाण्यायोग्य उपलब्ध करून द्यावी अशी मागणी जोर धरत आहेत मात्र याकडे सा. बा. विभाग व लोकप्रतिनिधी लक्ष देतील का हाच आता मोठा प्रश्न आहे.
खंडगाव ते राजुरा हा रस्ता अत्यंत खराब झाल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे प्रशासन लक्ष देऊन लवकरात लवकर रस्ता बनवावा नाही तर शेकाप येणाऱ्या काळात आंदोलन करेल
(अँड. गोविंद डुमणे शेकाप चिटणीस नांदेड)
जाहुर ते खरब खंडगाव हा रस्ता अत्यंत खराब आहे. या रस्त्यावर फिरण हाताने जीवित हानी करून घेणे असे या रस्त्याची हालत आहे. तरी शासनाने या रस्त्याचे काम त्वरित चालु करावे अन्यथा स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड कडुन होमहवन करून शासनाचा जाहीर निषेध करण्यात येईल याची नोंद घेण्यात यावी.
(वैभव पाटील राजुरकर
जिल्हाध्यक्ष वि. आ.
स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड नांदेड)
सर्वात जुना असणारा व अतिशय वर्दळीचा असणारा रस्ता आज कामाची मंजुरी मिळुन सुध्दा कंत्राटदाराच्या निष्काळजीमुळे प्रलंबीत पडला आहे .यांच्या मनमानीमुळ आज ये जा करणार्या प्रवाशांना मात्र तारेवरची कसरत करावी लागत आहे त्यासाठी ताबडतोब हा रस्ता पुर्ण करावा हि नंम्र विनंती.
(बालाजी पाटील सांगवीकर, राष्ट्रवादी काॅग्रेस, मुखेड)