Thursday, December 5, 2024
Homeआरोग्यकोरोनामुळे माजी नगरसेवकाचा मृत्यू; परिस्थिती चिंताजनक

कोरोनामुळे माजी नगरसेवकाचा मृत्यू; परिस्थिती चिंताजनक

औरंगाबाद (प्रतिनिधी) : कोरोनामुळे शिवसेनेच्या माजी नगरसेवकाचा आज मृत्यू झाला. मनपाच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.नीता पाडळकर यांनी या वृत्ताला दुजोरा दिला.

कोरोना विषाणूने आता शहरातील लोकप्रतिनिधींनाही विळखा घातला आहे. शहरातील सेनेच्या एका माजी नगरसेवकाला उपचारासाठी एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने ते व्हेंटिलेटरवर होते. दरम्यान, उपचार सुरू असतानाच त्यांनी आज मंगळवारी दुपारी अखेरचा श्वास घेतला. कोरोना शिवाय ते इतरही व्याधींनी ग्रस्त होते. आता त्यांच्या संपर्कातील इतरही व्यक्तींची तपासणी करण्यात आल्याची माहिती डॉ. नीता पाडळकर यांनी दिली आहे.

औरंगाबाद शहरात कोरोना विषाणूचा कहर वेगाने वाढत असून रोज नवनवे आकडे समोर येत आहे. अशातच कोरोनामुळे  शिवसेनेच्या एका माजी नगरसेवकाचा मंगळवारी दुपारी मृत्यू झाल्याचे चिंतेचे वातावरण आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय