Sunday, May 5, 2024
HomeNewsदेश विदेशातील आजच्या महत्त्वाच्या टॉप टेन घडामोडी वाचा एका क्लिक वर

देश विदेशातील आजच्या महत्त्वाच्या टॉप टेन घडामोडी वाचा एका क्लिक वर

                 

१) मॅक्सिको जगातील सर्वाधिक कोरोनाबाधित मृत्यूदर असलेल्या देशाच्या सूचीत ३ ऱ्या स्थावर पोहोचला


मॅक्सिको शहर, मॅक्सिको: अमेरिका, ब्राझील नंतर मॅक्सिकोमध्ये जगातील सर्वाधिक कोरोनाबाधितांचा मृत्यू झालेले आहेत. गेल्या २४ तासात ६८८ लोकांचा मृत्यू नोंदवत मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या ४६६८८ झाली.

२)दक्षिण कोरियामध्ये ख्रिश्चन धर्माच्या एका पंथाच्या प्रमुखाला कोरोनाबाबत माहिती लपवण्याखाली अटक करण्यात आली


सेऊल, दक्षिण कोरिया: कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव पाहता आजारी व्यक्तींची माहिती सरकार गोळा करत असते. परंतू, चर्चमध्ये आलेल्या लोकांची माहिती लपवल्यामुळे ५२०० पेक्षा जास्त लोक चर्चच्या संपर्कात आल्यामुळे कोरोनाबाधित झाले.

३)श्रीलंकेत तमिळ राष्ट्रीय गटबंधन ग्रहयुद्धानंतर प्रथमच निवडणूकीच्या प्रक्रियेत


कोलंबो, श्रीलंका: श्रीलंकेत तमिळ लोकांबरोबर झालेल्या ग्रहयुद्धानंतर राष्ट्रीय तमिळ गटबंधन बनवण्यात आलेले असून ते निवडणूकीमध्ये सहभागी होणार आहे. ग्रहयुद्धानंतर प्रथमच ते जनमताला सामोरे जाणार आहे.

४)जबरदस्ती वेगळे करण्याचा प्रयत्न भारत आणि चीन दोन्ही देशांना घातक ठरू शकतो: चीनी द्विपक्षिय पथक


दिल्ली, भारत: नुकत्याच झालेल्या आर्थिक परिषदेत भारत आणि हे एकमेंकांवरती अवलंबून असून त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेत चीनला वेगळे केले गेले तर दोघी देशांच्या अर्थव्यवस्थेला घातक ठरू शकते असे प्रतिपादन भारतामध्ये असणाऱ्या चीनच्या द्विपक्षिय अधिकाऱ्याने केले.

५)युरोपिय संघाची अर्थव्यवस्था १२% नी दुसऱ्या त्रिमाहीत घसरली


पॅरिस, फ्रान्स: जागतिक अर्थव्यवस्था मंदीच्या प्रभावात जात असल्याचे नुसतेच समोर येत असून युरोपिय संघाची ही अर्थव्यवस्था १२% नी दुसऱ्या त्रिमाहीत घसरली. शहरबंदीमुळे युरोपिय संघाच्या खूप मोठ्या अर्थव्यवस्थेला बसल्याचा प्रकार समोर येत आहे.

६)अफगाणिस्तामध्ये तीन दिवसांची गोळीबार बंदी सुरू झाली


काबूल, अफगाणिस्तान: अफगाणिस्तान सरकारने ३ दिवस ईद अल अधा सनामुळे तालिबान बरोबर कोणतीही चकमक किंवा गोळीबार करणार नसल्याचे सांगितले होते. त्याची कारवाई त्यांनी सुरू केली. त्यामुळे तालिबान ही कोणता अनुचित प्रकार करणार करणार नाही असे तालिबानकडून सांगण्यात आले होते. परंतु, याप्रक्रियेला मोठ्या प्रमाणात परिक्षा द्यावी लागणार आहे कारण गोळीबार बंदीची प्रक्रियेच्या सुरू होण्याच्या २४ तास आधी एका कारमध्ये बॉम्ब फुटला होता, तालिबानने त्यांनी तो प्रकार केला नसल्याचे नमूद केले होते.

७)व्हिएतनाममध्ये कोरोनामुळे पहिला मृत्यूची नोंद झाली


हानोई, व्हिएतनाम: व्हिएनाममध्ये गेल्या शंभर दिवसात एकही कोरोना बाधित आढळला नव्हता. परंतु, दानांग शहरात प्रार्दुभाव झाल्यानंतर आज एका व्यक्तीचा मृत्यू झाला. दानांगमध्ये युद्धापातळीवरती कोरोना चाचणीची प्रक्रिया सुरू आहे.

८)अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी टिकटॉकवर येता शनिवार पर्यंत बंदी घालणार असल्याचे सांगितले


न्युयॉर्क, अमेरिका: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्याने टिकटॉक वापरू नये यासाठी बंदीचे आदेश येत्या शनिवार पर्यंत देणार असल्याची घोषणा केली. तसेच ते चीनच्या कंपनीला टिकटॉक विकण्याची सूचनाही करणार आहेत.

९)कोरोनाला जागतिक आपत्ती घोषित केल्यानंतर सहा महिने झाल्यावर जागतिक आरोग्य संघटनेने त्यांचा अहवाल प्रकाशित केला


जिनिव्हा: जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाला जागतिक आपत्ती घोषित केल्यावर त्यावर अहवाल प्रकाशित केला, त्यामध्ये ६७५००० व्यक्ती मृत्युमुखी पडल्या असून १ कोटी ७३ लाख कोरोना बाधित झाल्याचे सांगितले. तसेच जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी जेव्हा १०० पेक्षा कमी कोरोनाबाधित चीनमध्ये सापडल्यानंतर आणि कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू झालेला नसताना जागतिक आपत्ती घोषित केली होती अशी स्पष्टोक्ती दिली.

१०)ऑस्ट्रेलियाचे मोठ्या द्विपक्षिय अधिकाऱ्याने चीनच्या भारत द्विपक्षिय प्रमुखावरती दक्षिण चीनी समुद्रावरती केलेल्या वक्तव्यावरून टिका केली


दिल्ली, भारत: चीनच्या भारतातील द्विपक्षिय अधिकाऱ्याने दक्षिण चीनी समुद्रावरती जर जागतिक प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला जात असेल तर मोठ्याप्रमाणात परिणाम होऊ शकतात असे वक्तव्य केल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या द्विपक्षिय मोठ्या अधिकाऱ्याने त्यांवर जोरदार टिका केली. तसेच चीनने दुसऱ्या राष्ट्रांवरती दबाव टाकण्याची नीती सोडून द्यावी असे सांगितले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय