Saturday, May 18, 2024
Homeराजकारणचंदीगड महापौर निवडणूकीत भाजपचा विजय, तर अधिकाऱ्याचा मतांमध्ये छेडछाड करतानाचा व्हिडिओ व्हायरल

चंदीगड महापौर निवडणूकीत भाजपचा विजय, तर अधिकाऱ्याचा मतांमध्ये छेडछाड करतानाचा व्हिडिओ व्हायरल

चंदीगड : चंदीगड महापौर निवडणुकीत भाजपला विजय मिळाला आहे. या निवडणुकीत भाजपचे उमेदवार मनोज सोनकर यांनी एकुण 16 मते मिळवत 4 मतांनी विजयी मिळवला. मनोज सोनकर आम आदमी पार्टीचे (आप) उमेदवार कुलदीप कुमार यांच्या विरोधात निवडणूक लढवत होते. गेल्या आठ वर्षांपासून नगराध्यक्षपद भाजपकडे आहे. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आज चंदीगडमध्ये महापौरपदाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत काँग्रेस-आम आदमी पार्टी (आप) आघाडी आणि भाजप यांच्यात थेट लढत होती.

चंदीगड महापौर निवडणुकीचा आता एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यावरून विरोधी पक्षांनी भाजप आणि पीठासीन अधिकारी अनिल मसीह यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. भाजपकडे कमी संख्या बळ असताना भाजपाचे उमेदवार मनोज सोनकर यांना महापौर घोषित करण्यात आले आहे.

पीठासीन अधिकारी अनिल मसीह यांनी आठ मते अवैध ठरविली. यावर आप आणि काँग्रेसने पीठासीन अधिकारी अनिल मसिह यांच्यावर अनेक मतांमध्ये छेडछाड केल्याचा आरोप केला. अनिल मसिह अनेक मतांवर पेन वापरताना व्हिडिओमध्ये दिसल्याचा आरोप काँग्रेस आणि आपच्या नगरसेवकांनी केला आहे. याचा पुरावाही व्हिडिओमध्ये आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात आहे. ही लोकशाहीची हत्या असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केली आहे.

दरम्यान, पीठासीन अधिकारी अनिल मसीह यांनी सकाळी 10.40 च्या सुमारास नगराध्यक्षपदासाठी मतदान प्रक्रिया सुरू केली होती. चंदीगडच्या खासदार किरण खेर यांनी पहिले मतदान केले. सकाळी 11.15 च्या सुमारास त्यांनी महापालिका भवनात मतदान केले. त्यांना चंदीगड महानगरपालिकेचे पदसिद्ध सदस्य म्हणून मतदानाचा अधिकार आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय