Thursday, December 5, 2024
Homeराजकारणभाजप प्रणित "अभाविप"ने दिल्या "इंडियन आर्मी गो बॅक" च्या घोषणा?

भाजप प्रणित “अभाविप”ने दिल्या “इंडियन आर्मी गो बॅक” च्या घोषणा?

आसाम (वृत्तसंस्था) :- भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या झटापटीत 20 भारतीय सैनिक शहीद झाले आहेत. चीन विरोधात भारतीय लोकांचा राग वाढत असताना, भाजप प्रणित “अखिल भारतीय विद्यार्थी परिषद”(ABVP) ने भारतीय सेने विरोधात घोषणा दिल्याचा आरोप (NSUI) ने केला आहे. देशभक्तीचा नारा देणारे भाजप आता आपल्या विंग वर बोलणार काय? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. भारतीय सैन्यांवरती राजकारण करणारी आणि श्रेय घेणारी भाजप आणि अभाविप हे राष्ट्रभक्तीचे सोंग करत असल्याचे नागरिकांनी ट्विटरवर मोहीम चालवली आहे.

      अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राज्य सचिव राकेश दास याने भारतीय सेने विरोधात घोषणा दिल्याचे वृत्त आसामच्या “टाइम 8” या वृत्त संस्थेने दिले आहे. लोकांनी त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करत अनेक प्रश्न उपस्थित केले आहे.

       आसाम “एनएसयुआय” ने ट्विट केले आहे की, “आमचे शूर सैनिक सीमेवर आपले बलिदान देत आहेत आणि @ABVPAssam राज्य सचिव राकेश दास आणि त्यांच्या कार्यकार्तांसह गुवाहाटीमध्ये “इंडियन आर्मी गो बॅक” ची ओरड करीत आहेत. @ABVPVoice वास्तविक तुकडे तुकडे टोळी.”

संबंधित लेख

लोकप्रिय