Thursday, May 2, 2024
Homeसंपादकीयजननायक शहीद बिरसा मुंडा

जननायक शहीद बिरसा मुंडा

https://maharashtrajanbhumi.in

       शहीद बिरसा मुंडा यांचा जन्म १५ नोव्हेंबर १८७५ रोजी माता करमी मुंडा आणि पिता सुगना मुंडा यांच्या पोटी अलिहातू या गावी झाला. साग्ला गावात प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर पुढील शिक्षणासाठी चाईबासा येथील इंग्लिश मिडिल स्कूल मध्ये आले. बिरसा हे अत्यंत तल्क बुध्दीचे होते. शिक्षण ढेत असताना आपल्या समाजावर चालेल्या अन्याय अत्याचाराबद्दल ते विचार करत असत. इंग्रज सरकारचे वर्चस्व आणि मिशनरीच्या जमिनींवर केला जाणाऱ्या कब्जामुळे बिरसा पेटून उठले.

          इंग्रजांनी १८७८-७९ रोजी प्रथमच वनांबद्दलचा कायदा केला, त्यामुळे जंगल सरकारच्या मालकीचे झाले.  इंग्रजांच्या राजवटीमध्ये आदिवासींंच्या वन संपत्तीवर असलेल्या अधिकारांवर निर्बंध आले. इंग्रजांच्या अत्याचाराला आणि शोषणाला बळी पडू लागले. अनेक आदिवासी बेघर झाले. आदिवासींंची उपजिविका ही जंगलावर अवलंबून असल्यामुळे वनातील फळे, कंदमुळे, लाकुडफाटा अथवा जनावरांचा चारा आणल्यास शिक्षा होऊ लागली. आदिवासींच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला, इंग्रज राजवटीविरोधात असंतोष खदखदत होता.

             सन १८९४ मध्ये छोटा नागपूर मध्ये भीषण दुष्काळ पडला होता. या दुष्काळात उपासमारी आणि महामारीने अनेक लोकांचा बळी घेतला. या काळात बिरसाने समाजातील गरजूंचा नि:स्वार्थीपणे सेवा केली. ब्रिटिश सरकारचे नव्या जमिनीदार रूढ केली होती. पैशाच्या स्वरूपात दिला जाणारा शेतसारा असल्यामुळे आदिवासी हतबल झाले होते. ब्रिटिश सरकारविरोधात प्रचंड असंतोष निर्माण झाला. याच असंतोषाला दिशा देण्याचे काम बिरसा मुंडा यांनी केले.

        १ आक्टोबर १९९४ मध्ये बिरसांंनी ब्रिटिश सरकार व जमिनीदारांविरोधात जनआंदोलन उभारले. बिरसांनी उभारलेल्या आंदोलनामुळे सर्व समाज एकजूट होत होता. बिरसाचे आंदोलन मोडून काढण्यासाठी ब्रिटिशांनी जमिनदार, जहांगीरदार प्रयत्न सुरू केले. सन १८९५ मध्ये बिरसांना अटक करण्यात आली. त्यांना दोन वर्षाचा कारावास करण्यात आला, त्यांना हजारीबाग तुरूंगात पाठविण्यात आले. त्यानंतर बिरसा मुंडांनी इंग्रजी सत्तेला उखडून टाकण्याचा संकल्प केला. बिरसांनी आदिवासी समाजाची सामाजिक व आर्थिक प्रगतीसाठी स्वातंत्र्याची आवश्यकता ओळखली होती. त्यामुळे त्यांनी संपूर्ण आदिवासी समाजाला संघटित करून ब्रिटिश सरकारविरोधात स्वातंत्र्यलढा उभारला.

       सन १८९७ साली खुंटी पोलीस स्टेशनवर हल्ला चढवला, सन १८९८ साली तांगा नदी किनारी ब्रिटिश सैन्य व बिरसा आणि साथीदार यांच्यात जोरदार प्रतिकार झाला. त्यात ब्रिटिश सैन्याचा पराभव केला; परंतु त्यानंतर अनेक आदिवासींंना अटक करण्यात आली. सन १९०० साली डोंमबाडी पर्वतात सभा सुरू असताना इंग्रजांनी हल्ला चढवला आणि बिरसाच्या अनेक साथीदारांना अटक करण्यात आली. ३ फेब्रुवारी १९०० रोजी बिरसांना चक्रधरपूर येथे अटक झाली. ९ जून रोजी बिरसांना कारागृहात विष देऊन मारण्यात आले. एका क्रांतिकारी शहीदाचा देह शांत झाला. परंतु बिरसांंचे विचार मात्र आजही आदिवासी खेड्यापाड्यात पोहोचत आहेत. अन्यायाची जाणिवा होता, “उलगुलान जारी रहेगा” हे शब्द आठवतात.

            बिरसांनी उभे केलेले आंदोलन अनेक राज्यात पोहोचले होते. अगदी कमी वयात केलेला निश्चय आणि समाज बदलाची प्रचंड इच्छाशक्तीवर त्यांनी करून दाखवले. बिरसांच्या आंदोलनामुळेच सन १९०० साली सरकारने छोटा नागपूर क्षेत्रातील जमीन सुधारणा विषयक कायदे लागू केले. 

           उलगुलान म्हणजे शोषणावर आधारलेली व्यवस्था बदलणे. नैसर्गिक हक्क अबाधित ठेवण्यासाठी चाललेला हा संघर्ष नव्या आदिवासी समाजाच्या सामाजिक, आर्थिक राजकीय बदलाची प्रक्रिया होती. आजही आदिवासी समाज उपेक्षितच आहे. जल, जंगल, जमीन यांच्यावरील मक्तेदारी प्रस्थापित केली जात आहे. आदिवासींच्या नैसर्गिक हक्कांवर गदा आणण्याचे प्रयत्न केले जात आहेत. हे थांबविण्यासाठी एकजूट गरजेची आहे. संविधानाने दिलेले हक्क, अधिकार अबाधित ठेवण्यासाठी आदिवासींंना येणाऱ्या काळात संघर्ष केल्याशिवाय पर्याय नाही!

नवनाथ मोरे

९९२१९७६४६०

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय