Friday, December 27, 2024
Homeजिल्हाबिरसा क्रांती दल नंदुरबार जिल्हा कार्यकारिणी जाहीर, महासचिवपदी बळीराम पावरा यांची निवड

बिरसा क्रांती दल नंदुरबार जिल्हा कार्यकारिणी जाहीर, महासचिवपदी बळीराम पावरा यांची निवड

नंदुरबार : बिरसा क्रांती दल नंदुरबार जिल्हा महासचिव पदी बळीराम पावरा यांची निवड करण्यात आली. बळीराम पावरा हे पेशाने शिक्षक असून उच्च शिक्षित आहेत. सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांची विशेष ओळख आहे. आदिवासी समाजाबद्धलची त्यांची काम करण्याची धडपड बघूनच त्यांची जिल्हा महासचिव पदी निवड करण्यात आली  

असल्याची माहिती बिरसा क्रांती दलाचे नाशिक विभाग प्रमुख मनोज पावरा यांनी दिली. तर जिल्हा प्रवक्तापदी राजेंद्र पाडवी यांची निवड करण्यात आली आहे.

नंदुरबार जिल्हा कार्यकारिणी पुढीलप्रमाणे :

जिल्हाध्यक्ष प्रभारी साहेबराव कोकणी, उपाध्यक्ष राहूल पावरा, दयानंद चव्हाण, महासचिव बळीराम पावरा, कार्याध्यक्ष प्रा. वसंत पावरा, कोषाध्यक्ष लक्ष्मण वळवी, सहसचिव दिलवर वसावे, सल्लागार मंगेश सुळे, प्रवक्ता राजेंद्र पाडवी, महिला प्रतिनिधी वनिता पावरा, संघटक रतिलाल पावरा, प्रसिद्धी प्रमुख विजय वळवी, सदस्य पंकजकुमार पाडवी, गुरूदास वसावे, विजय वळवी, अशोक वळवी, बेबी कोकणी यांची निवड करण्यात आली आहे. 

यावेळी कोकण विभाग प्रमुख सुशीलकुमार पावरा, धुळे जिल्हाध्यक्ष वसंत पावरा व सांगली जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाडवी हे उपस्थित होते. नवनिर्वाचित सर्व जिल्हा पदाधिकारी व सदस्य यांचे मनोज पावरा यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

संबंधित लेख

लोकप्रिय