MPSC Bharti : महाराष्ट्र लोकसेवा आयोग (Maharashtra Public Service Comission, MPSC) ने पदभरती संदर्भात नुकतेच एक प्रसिद्धीपत्रक जाहीर केले आहे. यानुसार महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरिता आरक्षण अधिनियम 2024 राज्यात 26.02.2024 पासून लागू करण्यात आलेला आहे.
सदर अधिनियमान्वये सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग प्रवर्गासाठी राज्याच्या लोकसेवांमधील शासकीय व निमशासकीय सेवेत सरळसेवा भरतीच्या पदांमध्ये व शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशासाठी 10 टक्के आरक्षण विहित करण्यात आले आहे.
सदर अधिनियमास उच्च न्यायालय, मुंबई येथे रिट याचिका क्र. 3468/2024 व इतर अन्वये आव्हान देण्यात आलेले आहे. प्रस्तुत न्यायालयीन प्रकरणी उच्च न्यायालयाने 16.04.2024 रोजी शासकीय व निमशासकीय सेवेतील सरळसेवा भरती व शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशाबाबत काही निर्देश दिलेले आहेत. यानुसार मराठा आरक्षणाच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांची सुनावणी 13 जूनपर्यंत तहकूब करताना उच्च न्यायालयाच्या पूर्णपीठाने आरक्षणास स्थगिती देण्याबाबत कोणताही तातडीचा आदेश दिला नाही. परंतु, आरक्षणानुसार शैक्षणिक प्रवेश आणि सरकारी नोकऱ्यांतील नियुक्त्या केल्या गेल्यास त्या अंतिम निर्णयाच्या अधीन असतील, असे पूर्णपीठाने प्रामुख्याने स्पष्ट केले. त्यामुळे भरती प्रक्रिया रखडली आहे.
…यामुळे MPSC च्या परीक्षा पुढे ढकलल्या
लोकसभा निवडणूक आणि मराठा समाजाच्या आंदोलनाची दखल घेत राज्य शासनाने फेब्रुवारीत मराठा आरक्षणाचा कायदा केला. मराठा आरक्षण लागू होण्याआधी ‘एमपीएससी’च्या अनेक जाहिराती प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यानुसार विविध विभागांच्या परीक्षा प्रलंबित होत्या. आता 10 टक्के मराठा आरक्षण निश्चितीनंतरच परीक्षांच्या सुधारित तारखा प्रसिद्ध केल्या जाण्याची शक्यता आहे. मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी ‘एमपीएससी’ने आगामी परीक्षा पुढे ढकलल्याची माहिती आहे. मात्र, तोंडावर आलेल्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने तसेच पुढील तारखांची घोषणा न झाल्याने उमेदवारांमध्ये नाराजीचा सूर आहे.
उमेदवारांमध्ये चिंतेचे वातावरण
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे येत्या 28 एप्रिल रोजी होणारी ‘महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024’, तसेच 19 मे रोजी होणाऱ्या ‘समाज कल्याण अधिकारी गट ब’, ‘इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट ब’ या परीक्षा पुढे ढकलल्याचे जाहीर करण्यात आले. या परीक्षांच्या सुधारित तारखा यथावकाश जाहीर करण्यात येतील, असे आयोगाकडून कळवण्यात आले आहे. परंतु, आयोगाने परीक्षांची पुढील तारीख अद्यापही जाहीर न केल्याने परीक्षार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
मराठा आरक्षणाची अंमलबजावणी केल्यानंतर तारखांची घोषणा होण्याची शक्यता
‘एमपीएससी’च्या पत्रकानुसार, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्टय़ा मागासवर्गाकरिता अधिनियम 2024 मधील आरक्षण तरतुदी विचारात घेऊन शासनाकडून सुधारित आरक्षण निश्चिती प्राप्त झाल्यानंतर परीक्षांची घोषणा केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. विधिमंडळात मराठा आरक्षणाचे विधेयक एकमताने मंजूर झाल्यानंतर ते राज्यपालांकडे पाठवण्यात आले होते. त्यांच्या स्वाक्षरीनंतर राज्यात 26 फेब्रुवारीपासून मराठा समाजाला स्वतंत्र संवर्गात 10 टक्के आरक्षण लागू करण्यात आले. त्यानुसार आता ‘एमपीएससी’च्या आगामी परीक्षांमध्ये मराठा आरक्षणाची अंमलबजावणी केल्यानंतरच परीक्षेच्या तारखांची घोषणा होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा :
12वी उत्तीर्णांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; जागा 3700+
पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत 150 जागांसाठी भरती; पात्रता 10वी उत्तीर्ण
NLC इंडिया लिमिटेड अंतर्गत भरती; आजच करा अर्ज!
Mumbai : बृहन्मुंबई महानगरपालिकेत भरती सुरू
नोकरी शोधत आहात? सरकारी, निमसरकारी विभागांमध्ये विविध पदांची भरती!
हिंदुस्थान उर्वरक आणि रसायन लिमिटेड अंतर्गत 80 जागांसाठी भरती
NVS : नवोदय विद्यालय समिती मोठी भरती; पात्रता 10वी, 12वी, पदवी, नर्सिंग, पदव्युत्तर…
भारतीय डाक विभाग अंतर्गत भरती; 10वी उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी!
CDOT : टेलीमॅटिक्स विकास केंद्र अंतर्गत भरती; पगार 1 ते 2 लाख रुपये
इंडियन आर्मी अंतर्गत शॉर्ट सर्व्हिस कमिशन पदांची भरती
BECIL : पदवीधरांना 50 हजार रूपयांच्या फेलोशीपची संधी!
ARI पुणे अंतर्गत खाजगी सचिव, लघुलेखक पदांची भरती
केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात 506 जागांसाठी भरती
रेल्वेत प्रवासी तिकीट परीक्षक पदांच्या 8000+ जागांसाठी लवकरच भरती
बिझनेस करायची आयडिया आहे? मग शासनाची “ही” योजना करेल मदत!
टाटा मेमोरियल सेंटर, मुंबई अंतर्गत विविध पदांसाठी मोठी भरती