मुंबई : राज्यातील विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागून राहिलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षाबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. अवघ्या १० दिवसांवर येऊन ठेपलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. काहीवेळापूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची बैठक पार पडली.
सध्याच्या स्थितीत ऑफलाईन परीक्षा घेणे शक्य नाही तर परीक्षा ऑनलाईन घेतल्या तरी ग्रामीण भागात इंटरनेट नेटवर्कची पुरेशी सुविधा नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना परीक्षा देणे अवघड असल्याने अखेर परीक्षा पुढे ढकलण्याखेरीज दुसरा कोणताही पर्याय नाही, असा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे. त्यामुळे आता बारावीची परीक्षा मे महिन्याच्या अखेरीस तर दहावीची परीक्षा जून महिन्यात होणार आहे.
अधिक वाचा