Sunday, December 8, 2024
Homeग्रामीणजुन्नर : दोन दिवसांच्या विकेंड लॉकडाऊन नंतर सोशल डिस्टन्सचा अक्षरशः फज्जा

जुन्नर : दोन दिवसांच्या विकेंड लॉकडाऊन नंतर सोशल डिस्टन्सचा अक्षरशः फज्जा

जुन्नर : दोन दिवसांच्या लॉकडाऊननंतर खरेदीकरिता जुन्नर शहरात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

राज्य सरकारने शनिवारी आणि रविवारी विकेंड लॉकडाऊनची घोषणा केला आहे. त्यामध्ये दोन दिवस अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच दुकाने आणि वाहतूक व्यवस्था बंद करण्यात आली होती. अशातच उद्या गुढीपाडवा सण असल्याने आज सकाळीच जुन्नर तालुक्यातील नारायणगाव, जुन्नर शहर अशा अनेक भागात अचानक गर्दी वाढली. त्यामुळे सोशल डिस्टन्सचा अक्षरशः फज्जा उडाला. 

बाजारपेठेतील वाढती गर्दी लक्षात घेता नारायणगाव पोलीस प्रशासनाने नागरिकांना तात्काळ सूचना देत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद करत गर्दी कमी करण्याच्या सूचना दिल्या.

दरम्यान, राज्य सरकारकडून पुढील दोन दिवसांत आणखी कडक निर्बंध घालत लॉकडाऊन करण्याचे संकेत दिले जात असल्याने खरेदीसाठी गर्दी आणखी वाढत आहे.

अधिक वाचा

जुन्नर तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागातील पिंपरवाडी बनतेय कोरोनाचे हॉटस्पॉट

संबंधित लेख

लोकप्रिय