बालासोर : कोरोमण्डल एक्सप्रेसला काल सायंकाळी झालेल्या अपघातात एकूण 200 प्रवासी ठार मृत्युमुखी पडले असून 900 हुन जास्त लोक जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. हा आकडा वाढण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘अपघातात जीव गमावलेल्या लोकांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहे, असे म्हटले आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या वारसांना प्रत्येकी 10 लाख रुपये तर गंभीर जखमीना प्रत्येकी 2 लाख तर किरकोळ जखमी झालेल्या लोकांना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी जाहीर केली आहे.
ANI वृत्तसंस्थेने म्हटले आहे की, हा अपघात तीन गाड्यांचा मिळून झाला आहे. रेल्वे मंत्रालयाचे प्रवक्ते अमिताभ शर्मा यांनी सुब्रत यांच्याशी बोलताना सांगितलं, “शालिमार-चेन्नई कोरोमंडल एक्स्प्रेसचे 10 डबे ओडिशातल्या बालासोर जवळच्या बाहानगा रेल्वे स्टेशनजवळ रुळावरुन घसरले. हे डबे बाजूच्या रुळावरुन जाणाऱ्या यशवंतपूर हावडा ट्रेनला जाऊन धडकले. यामुळे यशवंतपूर-हावडा ट्रेनचे काही डबेही घसरले. हे डबे घसरल्यानंतर जवळच्या एका मालगाडीला जाऊन आदळले. त्यामुळे हा भीषण अपघात झाला.
2016 नंतरचा हा सर्वात मोठा अपघात आहे, त्यामुळे रेल्वेच्या सुरक्षा व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
हे ही वाचा :
दहावीचा निकाल लागला, कोकण अव्वल तर “हा” विभाग सर्वात कमी
महिला खेळाडूंच्या लैंगिक शोषणाच्या आरोपावरून भाजपाच्या महिला खासदाराचा मोदी सरकारला घराचा आहेर
महापुरूषांविषयी आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या ‘या’ वेबसाईटवर कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
ब्रेकिंग : उद्धव ठाकरे यांना दुसरा मोठा धक्का, हजारो कार्यकर्ते शिंदे गटात
राज्यातील 20 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या; तुकाराम मुंडेसह हे आहेत अधिकारी!