मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या गटाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोठा धक्का द्यायच्या तयारीमध्ये आहेत. ठाकरे गटाला खिंडार पाडण्याची रणनिती शिंदे गटाकडून आखली जात आहे. त्यातच आता मुंबई मधील ठाकरे गटाचे नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला.
मुंबईमधील चांदिवली येथील प्रभाग क्र. १६० चे नगरसेवक किरण लांडगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खा.डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत हजारो कार्यकर्त्यांच्या सोबत शिवसेनेत प्रवेश केला.
शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के यांच्या ट्विट ची चर्चा
काल शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के यांच्या ट्विट करत ठाकरे गटातील कार्यकर्ते शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे संकेत दिले होते. ते खरे ठरले आहेत.
काय म्हणाले नरेश म्हस्के?
परीक्षा आता जवळ आली, वाजणार आहे घंटा, लागेल कस एकेकाचा ‘उठा’ आता ‘उठा’. एकेक जण येतो आहे खऱ्या शिवसेनेत लागली आहे गळती, तिकडे शिल्लक सेनेत आजच आहे शुभमुहूर्त, असे योग येतील सतत स्वार्थ सोडून विचाराची कास एकदा धरतील परत, असं ट्वीट नरेश म्हस्के यांनी केलं आहे.
हे ही वाचा :
डॉ.पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशनची व्याप्ती वाढविली
शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! केवळ एक रुपयात पीक विमा योजनेचा लाभ
कामगार संहितेस राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी; कोणते बदल होणार पहा !