Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोठी घोषणा केली आहे. लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना बिनशर्त पाठिंबा देणार असल्याचे त्यांनी जाहीर केली आहे. गुढीपाडव्यानिमित्त मुंबईच्या शिवाजी पार्कवर झालेल्या सभेत राज ठाकरे (Raj Thackeray) बोलत होते त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आपला पक्ष यावेळी लोकसभा निवडणुकीत सहभागी होणार नसल्याचे स्पष्ट करत 2024 च्या लोकसभा निवडणूकीत एनडीए आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देणार असल्याचे जाहीर केले आहे. आम्हाला राज्यसभा नको आहे आणि कोणत्याही प्रकारची तडजोडही नको आहे, असे राज ठाकरे म्हणाले. आम्ही भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला पाठिंबा देऊ कारण आमचा पाठिंबा फक्त पंतप्रधान मोदींना आहे, असे ते म्हणाले.
राज ठाकरे म्हणाले, अनेक दिवसांपासून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस मला सांगत होते की आपण एकत्र यावे. पण कसे यावे हे मला समजत नव्हते. त्यामुळेच मी अमित शहा यांच्या भेटीची वेळ मागितली, असेही ते म्हणाले.
विधानसभेची तयारी करण्याच्या सुचना
विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू करण्याचे आवाहन राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना केले. ते म्हणाले, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माझ्या सर्व सहकाऱ्यांना माझी विनंती आहे की, एक चांगली संघटना निर्माण करा. तुम्ही विधानसभेची तयारी सुरू करा.
दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप नेते आणि केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. त्यावेळी मनसे महायुतीत सहभागी होणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.
हे ही वाचा :
मोठी बातमी : अरविंद केजरीवाल यांना दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा झटका
काँग्रेसला मोठा धक्का, काँग्रेस प्रवक्ते राजू वाघमारे यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश
मोठी बातमी : महाविकास आघाडीची पत्रकार परिषद, वाचा कोणत्या पक्षाला किती जागा !
भाजपच्या बड्या नेत्याने घेतली सलमान खानची भेट, राजकिय वर्तूळात जोरदार चर्चा
सीमा हैदरला पतीकडून जबर मारहाण ; डोळा काळानिळा, चेहरा सुजला ?
विरोधकांनी फक्त परिवाराचाच विकास केला – पंतप्रधान नरेंद्र मोदी
पुण्यात नोकरी शोधताय? सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!
मोठी बातमी : अजित पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षांवर हल्ला, राष्ट्रवादी भाजपविरोधात आक्रमक
भरदिवसा पृथ्वीवर होणार तब्बल ४ मिनिट अंधार, वाचा काय आहे कारण !