Friday, June 20, 2025
---Advertisement---
---Advertisement---

Alandi : आळंदीत माऊलींचे पालखी रथ बैलजोडीची भव्य मिरवणूक, ढोलताशांच्या दणदणाटात

फटाक्यांची आतषबाजी ; बँडची ही साथ लक्षवेधी (Alandi)

चार बैलजोड्यांची मिरवणूक ; बैलजोड्यांची संख्या वाढली

आळंदी (अर्जुन मेदनकर) : येथील संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळ्यातील श्रींचा वैभवी पालखी रथ ओढणा-या बैलजोडीची सेवा देण्याचा मान यावर्षी अर्जुन घुंडरे पाटील, विवेक घुंडरे पाटील यांना मिळाला आहे. (Alandi)

रथ ओढण्यास राजा – प्रधान, आमदार – मल्हार तसेच सावकार- संग्राम आणि माऊली – शंभू या चार ही बैलजोड्यांची आळंदी तील श्री स्वामी महाराज मठ येथून नगरप्रदक्षिणा मार्गे मिरवणूक झाली. दोन जोड्या महाद्वार चौक माऊली मंदिरा समोर आणण्यात आल्या.

मिरवणूक हरिनाम जयघोषात वाजत गाजत झाली. यावेळी शहरात ठीक ठिकाणी ढोलताशांच्या दणदणाटात, फटाक्यांची आतषबाजी करून आळंदी ग्रामस्थांनी मिरवणूक काढत बैलजोडीची जोरदार स्वागत केले. (Alandi)

बैलजोडीचे आळंदी देवस्थानने देखील स्वागत आणि पूजा परंपरेने माऊली मंदिरा समोरील महाद्वार समोर केली. पहिल्यांदाच माऊली मंदिरा समोर श्रींचा वैभवी रथ ओढणाऱ्या बैलजोडीस नियोजना अभावी सर्व चार ही बैल जोड आणण्यात आले नाहीत. पूजा करण्यास दोन बैल जोड मंदिरा समोर आणण्यात आले.

मंदिराकडे जाणाऱ्या महाद्वार रस्त्यावर श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटीचे वतीने दोन्ही बैलजोडीची पूजा करण्यात आली. यावेळी नगर विकास राज्य मंत्री माधुरी मिसाळ, संस्थानचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथसाहेब, विश्वस्त ॲड. राजेंद्र उमाप, विश्वस्त निलेश महाराज लोंढे, पुरुषोत्तम महाराज पाटील, रोहिणी पवार, पंढरपूर देवस्थान विश्वस्त ॲड. माधवी निगडे, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, तुकाराम माने, बैल समितीचे प्रमुख बबनराव कुऱ्हाडे पाटील, माजी नगराध्यक्ष राहुल चिताळकर पाटील, माजी उपाध्यक्ष रामदास भोसले, माजी विरोधी पक्षनेते डी.डी.भोसले पा., श्रींचे मानकरी योगिराज कुऱ्हाडे, योगेश आरु, ज्ञानेश्वर उर्फ माऊली दिघे, पुष्प सजावटीचे सेवेकरी सुदीप गरूड, माऊली गुळुंजकर, भैरवनाथ ग्रामदेवता उत्सव मंडळाचे अध्यक्ष शंकरराव कुऱ्हाडे, पै. शिवाजीराव रानवडे,कोर्ट बेलीफ भिमाजी घुंडरे, अजित मधवें आदीसह आळंदीतील नागरिक, विविध आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते. (Alandi)

श्रींचा वैभवी पालखी सोहळा भक्तिमय वातावरणात होत असतो. तत्पूर्वी आळंदी ग्रामस्थ देखील श्रींचा पालखी रथ ओढणारी मानाची बैलजोडीची भव्य मिरवणूक काढत असतात. यावेळी मिरवणूक मोठ्या भक्तिमय वातावरणात चार बैल जोड मिरवणूक झाली. युवक तरुणांच्या तरुणाईचे जल्लोषात मिरवणूक झाली. घुंडरे पाटील यांनी भव्य भारदस्त बैल जोडी लाखो रुपये देऊन विकत आणली आहे. या शिवाय पर्यायी बैलजोडी देखील तयार ठेवत दक्षता घेतली आहे. या लक्षवेधी बैलजोडीची आळंदीत भव्य मिरवणूक उत्साहात वाजत गाजत, हरिनाम जयघोषात झाली.

यावेळी भाविक, नागरिकांनी मोठी गर्दी केली. स्वामी महाराज मठापासून चाकण चौकातून मिरवणूक सुरु झाली. स्वामी महाराज यांचे पुजारी श्रीक्षेत्रोपाध्ये मुकुंद गांधी परीवारांतर्फे स्वागत पूजा करण्यात आली. घुंडरे पाटील परिवारातील गृहिणींनी मिरवणुकीचे सांगतेत सर्व बैलजोडीची पूजा करून औक्षण केले. माऊली मंदिराचे महाद्वारा समोर यावर्षी बैलजोडी घेऊन येण्यासाठी आवश्यक असताना या बाबतचे नियोजनाचा अभाव यावर्षी राहिला. अनेक दशक वर्षातून यावर्षी दूस-यांदा अशी घटना घडली. बैलजोडीचे आगमन स्वागताचे कार्यक्रमात बैलजोडीस पायघड्या टाकण्याचे नियोजनास देवस्थानला विसर पडला. यावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली.

मिरवणुकी दरम्यान काही वेळ आळंदीत वाहतूक कोंडी झाली. मात्र वाहतूक पोलीस विभागाने सुरळीत वाहतूक करण्यास परिश्रम घेत प्रदक्षिणा मार्गावर सुरक्षित वाहतूक करण्यास विशेष काळजी घेत यशस्वी नियोजन केले. मिरवणुकी साठी आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके, पोलीस नाईक मच्छिन्द्र शेंडे, दिघी आळंदी वाहतूक पोलीस निरीक्षक सतीश नांदुरकर, पोलीस कर्मचारी आणि सहकारी यांनी परिश्रम घेतले. पालखी रथास परंपरेने एकच जोड लावला जातो. मागील वर्षा पासून दोन बैल जोड आणि आता यावर्षी तर चक्क चार बैल जोड अशा ८ बैलांची मिरवणूक झाली. मात्र माऊली मंदिर महाद्वारात केवळ दोन बैल जोड यांची पूजा नगरविकास राज्य मंत्री माधुरी मिसाळ यांचे हस्ते झाली. अधिकच्या वाढत चाललेल्या बैल जोडीचे संख्या आणि निर्णयावर पालखी सोहळा प्रमुख आणि आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त चकार शब्द हि काढत नाहीत. या संदर्भात खुलासा देखील आळंदी देवस्थान करण्यास धजावत नाही. यामुळे देवस्थानच्या निर्णय क्षमतेवर आळंदी परिसरात चर्चा झडत आहे. (Alandi)

आळंदी देवस्थानने पालखी रथाचे देखभाल दुरुस्तीचे काम देखील सुरु केले असून ट्रॅक्टर लावून पालखी रथाची चाचणी घेतली आहे. आता बैलजोडी आळंदीत दाखल झाले असून त्याना जुंपून रथाची चाचणी बैलजोडी लावून घेतली जाणार आहे. यावर्षी सुमारे ५५ लोकांनी बैल जोड लावण्याची संधी मिळावी म्हंणून ६ अधिक ४९ लोकांचे सामूहिक सह्यांचे निवेदन देऊन मागणी केली होती. सामूहिक अर्जावर मात्र आळंदी देवस्थानने संबंधित यांना कळविले नसल्याचे शिवसेना ( उबाठा ) माजी तालुका प्रमुख उत्तमराव गोगावले यांनी सांगितले आहे.

---Advertisement---
WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles