Saturday, April 19, 2025
---Advertisement---
---Advertisement---

Beed : एसएफआय व डीवायएफआय तर्फे शहीद भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना बीडमध्ये अभिवादन

Beed : स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) आणि डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया (डीवायएफआय) या विद्यार्थी व युवक संघटनांच्या वतीने शहीद भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना अभिवादन करण्यात आले. एसएफआय व डीवायएफआय तर्फे शहीद दिनाच्या पूर्वसंध्येला शहरातील छत्रपती संभाजी महाराज क्रिडांगण येथे अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. Beed news

---Advertisement---

संपूर्ण भारतीय उपखंडात २३ मार्च हा दिवस ‘शहीद दिन’ म्हणून पाळला जातो. यानिमित्त महान भारतीय क्रांतिकारक शहीद भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांना बीडमध्ये एसएफआय व डीवायएफआय तर्फे अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी शहीदांच्या स्मृतींना उजाळा देत क्रांतिकारी गीतांचे सादरीकरण झाले. तसेच एसएफआयचे माजी राज्याध्यक्ष व डीवायएफआयचे जिल्हा अध्यक्ष मोहन जाधव, एसएफआयचे राज्य सचिव रोहिदास जाधव, जिल्हा सचिव विष्णू गवळी, शिवा चव्हाण, कुंडलिक खेत्री, सुहास जायभाये, दत्ता सुरवसे यांनी मनोगत व्यक्त केले.

अभिवादन कार्यक्रमास अतुल बडवे, प्रा. संदीपान उणवणे, प्रा. बाबासाहेब जावळे, शिवा चव्हाण, रमेश नाईकवाडे, अक्षय वाघमारे, आरती साठे, आकाश कचरे, अनिल राठोड, दत्ता सुरवसे, अमोल सानप, स्वप्नील तेलप, सुरज कदम, संकल्प साठे, युवराज चव्हाण, दिपक शिंदे, माऊली नाईकवाडे, सोमेश शिंदे आदींसह विद्यार्थी व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---Advertisement---
whatsapp link

हे ही वाचा :

ब्रेकिंग : काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्या गाडीवर हल्ला, शिंदे यांचा भाजपवर गंभीर आरोप

ब्रेकिंग : अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवर अण्णा हजारे यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

सर्वांत मोठी बातमी : मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक

ब्रेकिंग : कॉंग्रेसची राज्यातील पहिली यादी जाहीर

जुन्नर : नाणेघाट लेणीजवळ विनापरवाना बांधकाम; 2 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles