Saturday, April 27, 2024
Homeग्रामीणसावधान ! DMart बाबतची लिंक शेअर करत असल्यास आताच सावध व्हा !...

सावधान ! DMart बाबतची लिंक शेअर करत असल्यास आताच सावध व्हा ! इतरांनाही सांगा !

पुणे : सध्या व्हाट्सएपवर DMart बाबतची खोटी लिंक शेअर केली जात आहे. आताच सावध व्हा, लिंक शेअर किंवा ओपन करु नका. तुमची फसवणूक होऊ शकते.

सायबर पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण ने याबाबतचा इशारा नागरिकांना दिला आहे. तंत्रज्ञानाच्या वाढत्या वेगामुळे सायबर गुन्हेगार इंटरनेटवर वेगवेगळया पध्दती वापरुन नागरिकांची फसवणूक करत आहेत. 

सायबर पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण यांनी गुन्ह्याच्या विविध पध्दतींचे विश्लेषण केले असता असे निदर्शनास आले आहे की , सायबर गुन्हेगारांनी गुन्हे करण्याचे खालीलप्रमाणे मार्ग शोधले आहेत.

सध्या व्हॉट्सअॅपवर वर एक लिंक फिरत आहे सदर लिंक हि नामांकित सुपरमार्केट DMart यांची असल्याचे भासवून त्यांच्या २० व्या वर्धापन दिनानिमित्त, ग्राहकांना मोफत भेटवस्तू देण्याचा दावा करणारी बनावट लिंक, संदेश व्हॉट्सअॅपवर फॉरवर्ड केले जात आहेत.

ही  बनावट लिंकवर क्लिक केल्यास, एक वेबपेज उघडते ४ प्रश्न विचारले जातात जसे कि तुम्ही DMart ला ओळखता का ? तुम्ही कोणत्या वयोगटात बसता ? तुम्हाला Dmart कसे वाटते ? अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात . किंवा एक ‘ स्पिन व्हील ‘ दिले जाते ते फिरवल्यास एक पॉपअप येतो त्यात तुम्ही ५०००  रुपयांपर्यंतचे गिफ्ट कार्ड तसेच काही वस्तू जिंकला आहात असे भासवून सदर स्पर्धा इतर मित्रांसह व्हॉट्सअॅपवर ५ ग्रुप / २० मित्रांसोबत शेअर करा असे सांगितले जाते.

स्क्रीनवरील ब्लू बार पूर्ण होईपर्यंत वापरकर्त्याने शेअर करत राहणे आवश्यक आहे असे सांगून आपणाकडून आपल्या बँक विषयी गोपनीय माहिती विचारू शकतात, ज्यामुळे आर्थिक फसवणूक होवू शकते.

पुणे ग्रामीण जिल्हयातील नागरिकांना पुणे ग्रामीण पोलीसांतर्फे आवाहन करण्यात आले आहे की, यासारख्या फसव्या लिंक ओपन करु नये, आपला ओटीपी शेअर करु नये, अनोळखी अँप डाऊनलोड करु नये, अनोळखी फोन कॉलवर स्वत : ची कोणतीही माहिती देवू नये. तसेच कोणतीही बँक खात्याशी संबंधीत माहिती जसे की, पिन, सीव्हीव्ही, ओटीपी इ . माहिती मागत असल्यास सदरची गोपनीय माहिती कोणासही देऊ नये. तसेच समोरील व्यक्तीच्या सांगण्यावरुन कोणतेही अँप्लीकेशन डाऊनलोड करु नये. तसेच स्वत : च्या फेसबुक, इंस्टाग्राम, व्टिटर इ . च्या खात्याचा पासवर्ड स्वत : चा मोबाईल क्रमांक न ठेवता तो अंक / अक्षरे / चिन्ह असलेल्या स्वरुपात ठेवावा.

– रफिक शेख 


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय