Home ताज्या बातम्या सोशल मीडिया वापरासाठी मुलांना घ्यावी लागणार पालकांची परवानगी, वाचा काय आहे प्रकरण...

सोशल मीडिया वापरासाठी मुलांना घ्यावी लागणार पालकांची परवानगी, वाचा काय आहे प्रकरण !

१८ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी: भारतात नवा कायदा येणार Ban on social media for children under 18: New law to come in India

Social Media Ban in India : ऑस्ट्रेलियापाठोपाठ भारतातही १८ वर्षांखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर बंदी घालण्याचा विचार सुरू आहे. या संदर्भात केंद्र सरकार लवकरच नवा कायदा लागू करू शकते. सोशल मीडियावरील किशोरवयीन मुलांच्या वापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी हा कायदा केला जाऊ शकतो. या कायद्यानुसार, १८ वर्षांखालील मुलांना सोशल मीडियावर खाते उघडण्यासाठी पालकांची परवानगी आवश्यक असेल. (Social Media Ban Under 18)

नव्या डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन अॅक्ट (Digital Personal Data Protection Rules), २०२३ अंतर्गत नियमांचा मसुदा तयार करण्यात आला आहे. या मसुद्यानुसार, १८ वर्षांखालील मुलांना सोशल मीडियावर खाते उघडण्यासाठी पालकांची परवानगी आवश्यक असेल. या मसुद्यात म्हटले आहे की, डेटा संकलन करणाऱ्या संस्थेला हे देखील लक्षात ठेवावे लागेल की जो व्यक्ती मुलाची आई किंवा वडील असल्याचा दावा करत आहे त्याला कोणताही कायदेशीर आधार आहे की नाही. अर्थात मुलांच्या पालकांनी दिलेली परवानगी कायदेशीर आहे का. यासंदर्भात सरकारने लोकांकडून सूचनाही मागवल्या आहेत.

Social Media Ban in India

ऑस्ट्रेलियन सरकारने नुकताच १६ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया वापरावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, वयोमर्यादेचे पालन न करणाऱ्या सोशल मीडिया कंपन्यांवर कोट्यवधी डॉलर्सचा दंड ठोठावण्याचा निर्णय जाहीर केला आहे. याच पार्श्वभुमीवर भारतातही आता हालचाली सुरू आहे.

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने शुक्रवारी जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, मसुद्यावरील सूचनांसाठी नागरिक mygovernment.in या संकेतस्थळावर जाऊन आपले अभिप्राय नोंदवू शकतात. या सूचनांवर १८ फेब्रुवारी २०२५ पासून विचार केला जाणार आहे.

हे ही वाचा :

ओयो हॉटेल्सकडून नवी चेक-इन धोरण ; अविवाहित जोडपी अडचणीत ?

जगातील सर्वाधिक पगार घेतो ‘हा’ भारतीय वंशाचा माणूस, पगार ऐकून थक्क व्हाल

अणूशास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. राजगोपाल चिदंबरम यांचे निधन

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या प्रवेशद्वाराला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव

‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे सरकारने घेतले परत ? वाचा काय आहे प्रकरण !

चीनमध्ये पुन्हा कोरोनासारख्या नव्या विषाणूचा कहर, जगाची चिंता वाढली

मोठी बातमी : शेतकऱ्यांना मोठा दिलासा : ‘त्या’ जमिनी परत करण्यास मंत्रिमंडळाची मान्यता

नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी कंडोमपासून आलू भुजियापर्यंत ऑनलाईन विक्रमी खरेदी, यादी एकदा वाचाच !

Exit mobile version