Sunday, July 14, 2024
HomeNewsबधाई दो : राजकुमार राव, भूमी पेडणेकर यांनी घातला मोठ्या पडद्यावर धुमाकूळ...

बधाई दो : राजकुमार राव, भूमी पेडणेकर यांनी घातला मोठ्या पडद्यावर धुमाकूळ !

 

कलाकार: भूमी पेडणेकर, राजकुमार राव, सीमा पाहवा, शीबा चड्ढा, लवलीन मिश्रा, नितेश पांडे, शशी भूषण, चुम दरंग आणि दीपक अरोरा

 दिग्दर्शक : हर्षवर्धन कुलकर्णी

 रेटिंग: ३.५ (५ पैकी)

बधाई हो’ हा सिनेमा चांगलाच गाजला होता. वेडिंग थीम, नेहमीपेक्षा हटके विषय आणि कलाकारांचा अप्रतिम अभिनय असा हा सिनेमा प्रत्येक बाबतीत अव्वल ठरला होता. आयुष्यमान खुराणा, नीना गुप्ता व गजराज राव यांची जबरदस्त केमिस्ट्री असलेल्या या सिनेमाने 100 कोटींपेक्षा अधिक कमाई करून सगळ्यांचं लक्ष वेधलं होतं. शिवाय राष्ट्रीय पुरस्कारावरही नाव कोरलं होतं. ‘बधाई हो’ (Badhaai Do)नंतर या चित्रपटाचा सीक्वल ‘बधाई दो’ नावाने रिलीज झालाये. स्टार कास्ट बदलली आहे. शिवाय सिनेमाची संकल्पनाही बदललीये. राजकुमार राव (Rajkummar Rao) आणि भूमी पेडणेकरचा (Bhumi Pednekar) हा सिनेमा एका संवेदनशील विषयाला वाचा फोडतो. ‘लॅव्हेंडर मॅरेज’ या संकल्पनेवर आधारित असलेल्या या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांच्या मनात अपार कुतूहल आहे.  

Mister Mummy : रितेश देशमुख प्रेग्नंट?, ‘मिस्टर मम्मी’चे पोस्टर रिलीज!

आजही समलैंगिक जोडप्याला पाहून नाकं मुरडली जातात, त्यांच्यावर लोक हसतात, त्यांना कटू अनुभवांना सामोरं जावं लागतं. कायदेशीर मान्यता मिळूनही त्यांना ‘लोकाश्रय’ मिळाला आहे का? हा प्रश्न आजही कायम आहे. समलैंगिक संबंध ही एक विकृती म्हणूनच अनेकांच्या नजरेत आजही घर करून आहे. अशाच लोकांच्या डोळ्यांत अंजन घालण्याचं काम दिग्दर्शक हर्षवर्धन कुलकर्णीनं कौशल्यानं केलंय. विशेष म्हणजे सिनेमात ही अनोखी गोष्ट मांडताना त्यातील घटना आणि प्रसंगांमध्ये अवास्तव नाट्य लेखकानं घडवलेलं नाही. ‘एलजीबीटी कम्युनिटी’ला समजून आणि उमजून घेण्यासाठी कथानक पुरेसा वेळ देतं आणि कथानकाच्या उत्तरार्धाकडे प्रेक्षकांना अंतर्मुख होण्यास भाग पाडतं. तो आपल्यासमोर प्रश्न उभा करतो की? तुम्ही स्वतः समाज म्हणून ही ‘गोष्ट’ मान्य कराल का? 

कारण, केवळ कायदेशीर मान्यता मिळून हा प्रश्न सुटणारा नाहीय. जेव्हा ‘एलजीबीटी कम्युनिटी’ला समाजमान्यता मिळेल तेव्हाच हा प्रश्न सुटू शकेल. म्हणून लेखक-दिग्दर्शकांनी सिनेमातील नायक-नायिकेला ‘हिरोइझम’चा मुलामा दिलेला नाही. सर्वसामान्य भारतीय नागरिक म्हणूनच त्यांना पडद्यावर सादर केलं आहे; जेणेकरून प्रेक्षक स्वत:ला नायक-नायिकेत पाहतील आणि त्यांच्या अडचणी, भावभावना, प्रश्न समजून घेता येईल. हे सर्व करण्यात ‘बधाई दो’ हा सिनेमा प्रचंड यशस्वी ठरतो आणि एका महत्त्वपूर्ण विषयाला वाचा फोडतो.

भारतीय विज्ञान संस्थेच्या तांत्रिक सहाय्यक पदांच्या १०० जागांसाठी भरती!

नवीन वेगळ्या विषयाला हात घालण्याचे सामर्थ्य या निमित्ताने केले आहे..हा आगळा वेगळा प्रयोग प्रेक्षणाच्या पसंतीस नक्कीच उतरेल यात शंका नाही.

महाराष्ट्र जनभूनी न्यूज तर्फे या चित्रपटाला 5 पैकी 3.5 रेटिंग..

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय