पिंपरी चिंचवड : येथील दै. लोकमतचे वरिष्ठ उपसंपादक पत्रकार नारायण बडगुजर यांना स्टार रेटिंगमध्ये लोकमत समूहातील सर्वोत्कृष्ठ कामगिरीचा PERFORMANCE EXCELLENCY – 2021 ‘लोकमत’चे चेअरमन विजय दर्डा यांच्या हस्ते प्रशस्ती पत्र देऊन सन्मान करण्यात आला.
आदरणीय देवेन दर्डा करण दर्डा, मागर्दर्शक समूह संपादक विजय बाविस्कर, संपादक प्रेमदास राठोड, संजय आवटे, हणमंत पाटील उपस्थित होते.
भारतीय विज्ञान संस्थेच्या तांत्रिक सहाय्यक पदांच्या १०० जागांसाठी भरती!
‘लोकमत’मध्ये सुरवातीला डेस्कवर आणि त्यानंतर पूर्णवेळ वार्तांकनासाठी फिल्डवर ते वृत्तांकन करत असताना कोरोना महामारी आली आणि वार्तांकनासह बातमी लेखनातही अमूलाग्र बदल करावे लागले. त्यासाठी अनेक प्रयोग झाले. होत आहेत.
कोरोनामुळे महाराष्ट्रातील पत्रकारासमोर वृत्तांकन करताना धोकादायक वातावरणात जोखीम पत्करावी लागली होती. पिंपरी चिंचवड शहरात त्यांनी अहोरात्र काम केले. सरकारी यंत्रणा, आरोग्य विभाग यांच्या ऐतिहासिक कामगिरीचे सकारात्मक मूल्यमापन त्यांनी केले.
नारायण बडगुजर हे बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे एमए (मास कम्युनिकेशन) पदवीधर आहेत. गेली 20 वर्षे ते पत्रकार म्हणून काम करत आहेत.
दै. गावकरी, दै. तरुण भारत, दै.सकाळ, दै.पुढारी या नामांकित वृत्तसमूहमध्ये पत्रकार म्हणून काम केले. त्यानंतर ते लोकमत समूहाच्या पिंपरी -चिंचवड आवृत्तीमध्ये कार्यरत आहेत. आपले वर्तमानपत्र स्टार रेटिंगमध्ये येण्यासाठी त्यांनी लोकमत ई पेपरसाठी विशेष वृत्तांकन केले आहे.
आता खाता येणार रंगीत बटाट्याची भाजी; रोगप्रतिकारक क्षमताही वाढणार, नवे वाण विकसित
शहरातील नागरी समस्या, पाणीपुरवठा, सार्वजनिक स्वछता, रस्ते सुरक्षा, नदी प्रदूषण, वाहतूक कोंडी, गुन्हेगारी ई विविध विषयावर त्यांनी वार्तांकन करताना समस्या निवारण कसे होईल यावर जास्त भर दिला. ‘लोकमत’मधील या चार वर्षांच्या प्रवासात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत ‘लोकमत’कडून त्यांना स्टार ऑफ 2021 पुरस्कार प्रदान करण्यात आला.
– क्रांतिकुमार कडुलकर