Home News Avinash Dhanve : पुण्यात दिवसाढवळ्या गोळीबार, एकाचा मृत्यू

Avinash Dhanve : पुण्यात दिवसाढवळ्या गोळीबार, एकाचा मृत्यू

Avinash Dhanve : Daylight firing in Pune, one dead

Avinash Dhanve : विद्येचे माहेर घर असलेल्या पुण्यात एक खळबळजणक गुन्हेगारीची घटना घडली आहे. पुण्यामध्ये गुन्हेगारीचे सत्र सूरूच असून दिवसाढवळ्या गोळीबार करण्यात आला आहे, एका हॉटेलमध्ये गोळीबार झाला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. (Avinash Dhanve death)

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बाह्यवळणार हॉटेल जगदंबा प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंट आहे. या हॉटेलमध्ये ही गोळीबाराची घटना घडली आहे. या हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी अविनाश धनवे यांच्यासह चार युवक बसले होते. त्यावेळी आलेल्या अज्ञातांनी अचानक गोळीबार केला. या घटनेत अविनाश धनवे (Avinash Dhanve death) याचा मृत्यू झाला आहे. तो आळंदी परिसरातील चऱ्होली वरमुखवाडी येथे राहत होता. अचानक झालेल्या गोळीबाराने सगळीकडे खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अविनाश धनवे हा पंढरपूरला जात असताना जेवणासाठी जगदंबा हॉटेलमध्ये थांबलेला होता. त्यावेळी ही गोळीबाराची घटना घडली. या घटनेची दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. मात्र, हा गोळीबार कोणी केला, हे अद्याप समजू शकले.

कोण आहे अविनाश धनवे ?
अविनाश धनवे हा गुन्हेगार आहे. तो कोयता गँगचा म्होरक्या होता. अविनाश वर पिंपरी चिंचवड पोलिसांत ५ ते ७ गंभीर स्वरूपाचे गुन्हे देखील दाखल आहेत. गेली पंधरा वर्षांपासून तो गुन्हेगारी क्षेत्रामध्ये होता.

हे ही वाचा :

कळपातून उधळलेला बैल थेट कारमध्येच घुसला; नंदुरबारमधील घटना

जुन्नर : मुलीच्या बालविवाह प्रकरणी आई-वडिल, नवरदेव, सासु-सासरे, भटजीसह 8 जणांवर गुन्हा

राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेची आज सांगता सभा

अधिसूचना ते मतमोजणी लोकसभा निवडणुकीचे संपुर्ण वेळापत्रक

Exit mobile version