Thursday, March 27, 2025
---Advertisement---
---Advertisement---

अशोक चव्हाण यांनी ‘या’ दोन मोठया कारणांमुळे काँग्रेस पक्षाला ठोकला रामराम

अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. अशोक चव्हाण यांच्या या निर्णयाने पक्षातील सहकाऱ्यांनी धक्का बसल्याच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. निवडणुका तोंडावर आल्या असताना मोठ्या नेत्यानेच पक्षाला रामराम ठोकल्याने काँग्रेस पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे.अशोक चव्हाण यांनी इतका मोठा निर्णय घेतला असावा? याची कारणे जाणून घ्या.

अशोक चव्हाणांच्या जाण्यामागची कारणं?

भाऊराव चव्हाण साखर कारखान्यासाठी बुलढाणा अर्बन बँकेकडून 200 कोटींचे कर्ज घेतले होते. त्या प्रकरणाची कारखान्याची कुटुंबियांची ED चौकशी होणार असल्याच्याही चर्चा होणार असल्याची चर्चा होत होती. त्यासोबतच भाजपने काढलेल्या श्वेतपत्रिकेमध्ये आदर्श घोटाळ्याचा तपास अद्याप सुरू असल्याचं म्हटलं आहे.

आदर्श घोटाळ्याचा तपास सुरू असल्याचं श्वेतपत्रिकेमध्ये सांगितल्याने अशोक चव्हाणांच्या समोरील अडचणी वाढल्या असत्या. त्यामुळे चव्हाणांनी काँग्रेसला राम राम केल्याची चर्चा होत आहे. तर नांदेडमधून भाजपासाठी एक आश्वासक चेहरा म्हणून आपली निवड होऊ शकते, असं समर्थकांचं मत असल्याचं बोलं जात आहे. काँग्रेसमधाल अंतर्गत गटबाजीने चव्हाण नाराज असल्याची चर्चा आहे.

अशोक चव्हाण काय म्हणाले?

जन्मापासून आतापर्यंत काँग्रेस पक्षाचं काम केलं, आता अन्य पर्याय पाहिले पाहिजेत, अशा भावनेतून मी राजीनामा दिला आहे. काँग्रेस पक्षातील कोणत्याही आमदारासोबत माझी काही चर्चा झालेली नाही. राजकीय निर्णय पुढच्या दोन- ते तीन दिवसात घेईल, असं अशोक चव्हाण यांनी मीडियासोबत बोलताना सांगितलं.

दरम्यान, अशोक चव्हाण हे येत्या 15 फेब्रुवारीला भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून समजत आहे. अशोक चव्हाणांनी यावर बोलताना अदयाप कोणताही निर्णय घेतला नाही असं म्हटलं होतं. आता काही दिवासातच सर्व चित्र स्पष्ट होणार आहे.

---Advertisement---
WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles