Arvind Kejriwal : कथित दारु घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना दिल्ली उच्च न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून करण्यात आलेल्या अटकेविरोधात दिल्ली हायकोर्टात आव्हान देण्यात आलं होते. हायकोर्टाने ही याचिका फेटाळून लावली आहे.
दिल्ली मद्य धोरण घोटाळाप्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना झालेली अटक बेकायदेशीर असल्याचा दावा करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर आज (दि. ९ एप्रिल) दिल्ली उच्च न्यायालयाने माेठा निर्णय दिला. या प्रकरणी अरविंद केजरीवाल यांना ‘ईडी’ने केलेली अटक वैध असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. तसेच अटक कारवाईविरोधात दाखल करण्यात आलेली याचिका देखील न्यायालयाने फेटाळली आहे.
या प्रकरणी ३ एप्रिल रोजी दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी झाली होती. केजरीवाल यांच्या वतीने ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी तर ईडीच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एसव्ही राजू यांनी जोरदार युक्तीवाद केला होता. यानंतर न्यायमूर्ती स्वर्ण कांता शर्मा यांनी आपला निर्णय राखून ठेवला होता.
न्यायालयाने म्हटले आहे की, हे प्रकरण केंद्र सरकार आणि केजरीवाल यांच्यातील नाही तर ईडी आणि केजरीवाल यांच्यात आहे. ईडीकडे असणारे पुरावे पाहता ही अटक वैध आहे. तपासातील चौकशीपासून मुख्यमंत्री म्हणून कुठलीही सवलत दिली जाऊ शकत नाही. न्यायाधीश कायद्याने बांधलेले आहेत. राजकारणाशी नाही असंही कोर्टाने स्पष्ट केले.
हे ही वाचा :
काँग्रेसला मोठा धक्का, काँग्रेस प्रवक्ते राजू वाघमारे यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश
मोठी बातमी : महाविकास आघाडीची पत्रकार परिषद, वाचा कोणत्या पक्षाला किती जागा !
भाजपच्या बड्या नेत्याने घेतली सलमान खानची भेट, राजकिय वर्तूळात जोरदार चर्चा
सीमा हैदरला पतीकडून जबर मारहाण ; डोळा काळानिळा, चेहरा सुजला ?
विरोधकांनी फक्त परिवाराचाच विकास केला – पंतप्रधान नरेंद्र मोदी
पुण्यात नोकरी शोधताय? सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!
मोठी बातमी : अजित पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षांवर हल्ला, राष्ट्रवादी भाजपविरोधात आक्रमक
भरदिवसा पृथ्वीवर होणार तब्बल ४ मिनिट अंधार, वाचा काय आहे कारण !