Newsclick : दहशतवादविरोधी कायद्याप्रकरणी तुरुंगात असलेले न्यूज क्लिकचे संपादक प्रबीर पुरकायस्थ यांच्या अटकेवर सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. प्रबीर पुरकायस्थ यांची अटक ही बेकायदेशीर ठरवून त्यांची सुटका करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी दिले.
न्यूज क्लिकचे संपादक प्रबीर पुरकायस्थ यांनी दिल्ली पोलिसांच्या अटकेला आणि रिमांडला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. चिनी फंडिंगच्या आरोपावरून पोलिसांनी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये पुरकायस्थला अटक केली होती. सुप्रीम कोर्टाने बुधवारी (15 मे) यूएपीए प्रकरणात न्यूज क्लिकचे संपादक प्रबीर पुरकायस्थ यांना दिल्ली पोलिसांनी केलेली अटक बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे. तसेच प्रबीर पुरकायस्थ यांच्या सुटकेचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.
लाइव्ह लॉ च्या रिपोर्टनुसार, सर्वोच्च न्यायालयाने हे मान्य केले की रिमांड अर्जाची प्रत 4 ऑक्टोबर 2023 रोजी पुर्कायस्थ आणि त्यांच्या वकिलाला रिमांड आदेश जारी होण्यापूर्वी देण्यात आली नव्हती. म्हणजे अटकेचे कारण त्यांना लेखी कळवले नाही.
न्यायमूर्ती बी.आर.गवई आणि न्यायमूर्ती मेहता यांच्या खंडपीठाने सांगितले की, पोलिसांनी अटकेसाठी कारण दिलेले नाही, असे म्हणण्यास आम्हाला अजिबात संकोच वाटत नाही. रिमांड ऑर्डरही बेकायदेशीर आहे. त्यामुळे प्रबीरला सोडण्यात यावे. न्यूज क्लिकच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला.
Newsclick संपादक प्रबीर पुरकायस्थ यांच्यावर काय आहे आरोप
दिल्ली पोलिसांच्या एफआयआरनुसार, न्यूज क्लिकवर चिनी प्रचाराचा आणि देशाचे सार्वभौमत्व धोक्यात आणल्याचा आरोप होता. याशिवाय 2019 च्या लोकसभा निवडणुकीत निवडणूक प्रक्रियेत व्यत्यय आणण्यासाठी पीपल्स अलायन्स फॉर डेमोक्रेसी अँड सेक्युलॅरिझमसोबत कट रचल्याचा आरोप पुरकायस्थ यांच्यावर आहे.


हेही वाचा :
खासदार नवनीत राणा यांच्या घरी चोरी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे एकूण किती संपत्ती, आकडेवारी एकूण व्हाल थक्क
मोठी बातमी : नारायणगावात महादेव बेटिंग ऍप प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई, 70 ते 80 जण ताब्यात
ब्रेकिंग : खर्च नोंदवही तपासणीसाठी सादर न केल्यामुळे दोन उमेदवारांवर गुन्हे दाखल
मोठी बातमी : विधानपरिषद शिक्षक, पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका पुढे ढकलल्या
Ghatkopar hoarding tragedy: मृतांचा आकडा वाढला; 16 जणांचा मृत्यू
Tourism : उन्हाळ्याच्या सुट्टीत फिरायला जा, दक्षिण भारतात
नॅशनल ब्युरो ऑफ प्लांट जेनेटिक रिसोर्सेस अंतर्गत भरती
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीत नोकरीची शेवटची संधी
IITM : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी, पुणे भरती